You are currently viewing कृष्णकुंज वर कोळी महिला, मुंबईचे डब्बेवाले, मूर्तिकारांन पाठोपाठ आता विद्यार्थी-पालक समन्वय समितीहीनेही दिली भेट…

कृष्णकुंज वर कोळी महिला, मुंबईचे डब्बेवाले, मूर्तिकारांन पाठोपाठ आता विद्यार्थी-पालक समन्वय समितीहीनेही दिली भेट…

 

मुंबई :

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. ती लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पालक आणि विद्यार्थ्यांनी भेट घेतली. यासंदर्भात आज विद्यार्थी पालक समन्वय समितीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. जिम व्यवस्थापक, ग्रंथालयाचे संस्थापक, कोळी महिला, मुंबईचे डब्बेवाले आणि मूर्तिकार यांच्यापाठोपाठ आता विद्यार्थी-पालक समन्वय समितीनेही आपल्या समस्या मांडण्यासाठी कृष्णकुंज गाठलं आहे.

 

तसेच पालक आणि विद्यार्थ्यांनी फी वाढीचा मुद्दाही राज ठाकरे यांच्यासमोर मांडला. यावर राज ठाकरे यांनी तातडीने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना फोन करून याबाबत निर्णय घ्यावा, असं सांगितलं. लवकरच यावर शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा सरकार काढत असून आपण पुन्हा एकदा वर्षा गायकवड यांच्याशी यासंदर्भात चर्चा करू, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे रखडलेले ११वी प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरु व्हावी हीच अपेक्षा पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

 

शाळेत वसूल केली जाणारी फी आणि शाळेच्या मनमानी कारभाराबाबत मुंबईतील शाळेत शिक्षक घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शाळेकडून मनमानी कारभार सुरु असून शाळा फी द्ययाला सुद्धा नकार देत असल्याचे पालकांनी राज ठाकरे यांना सांगितलं. यावर आधी आपण सरकारशी हात जोडून बोलू नाहीतर मग हात सोडून बोलू, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी पालकांना दिलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा