You are currently viewing बांदा पोलिसांची कारवाई

बांदा पोलिसांची कारवाई

बांदा :

 

आलिशान कारमधून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर बांदा पोलिसांनी कारवाई करत कारसह एकूण ६ लाख १८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी प्रशांत सोमनाथ येरकळ(रा.वरवंटी ता.लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार यांनी केली.

मिळालेली माहितीनुसार, बांदा वाफोली मार्गावर गणेश मंदिर जवळ रस्त्यावर गोव्यातून लातूर येथे जाणाऱ्या होंडा कंपनीच्या एमएच १४ एफएस ३६६३ ही गाडी तपासणीसाठी थांबवली असता या गाडीत गोवा बनावटीची दारू लपवून ठेवलेली आढळली.याप्रकरणी कार चालकावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ क ६५(अ),६५(इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास बांदा पोलीस तेली करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा