You are currently viewing मूड

मूड

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य डॉ. बी. व्ही. कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

*…….. मूड……..*

निरोगी व सुखी जगायचं असेल तर आनंदी रहा असं सगळे तज्ज्ञ नेहमीच सांगत असतात. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. एकत्र राहण्याचे जसे काही फायदे असतात तसेच काही तोटेही असतात. पण तोटे मात्र बरेचसे मानवनिर्मित असतात. बोलता बोलता आपण किती सहज बोलून जातो न? कि,”आज माझा मूड बरोबर नाही, अमक्या तमक्यामुळं माझा मूड गेलाय “. वस्तुत: आपल्या त्रासाला इतर कुणीच जबाबदार नसतं. तर आपलाच दृष्टिकोन जबाबदार असतो. हे ऐकायला/ वाचायला थोडं कठीण जाईल काही लोकांना पण हेच सत्य असतं. अगदी बारकाईने निरीक्षण केलं तर सहज लक्षात येतं कि मानसिक अस्वास्थ्य हे अविवेकातून जन्म घेत असतं. सारासार विचार न करता, समोरच्याचे नीट ऐकून न घेता ताबडतोब प्रतिक्रिया देण्यातून अविवेक सिद्ध होत जातो. अविवेकामुळे त्रागा किंवा चिडचिड निर्माण होत असते. आणि त्याचे पडसाद म्हणून आपला मूड जात असतो. मनावर नियंत्रण असेल म्हणजेच विवेक शाबूत असेल तर असेल त्या परिस्थितीत आनंदाने/ सुखाने राहता येतं.
प्रेम, राग, मत्सर, द्वेष वगैरे भावना आयुष्यात महत्वाच्या असतात. पण त्या टोकाच्या असतील तर त्यातून आधी अविवेक आणि नंतर वेदना जन्म घेत असते. भावना कमालीच्या तीव्र असतील तर अभिव्यक्तीही तशीच तीव्र निर्माण होते. जसं मीठ स्वैपाकात महत्वाचं असतं पण तेच जर जास्त झालं तर संपूर्ण जेवण निरूपयोगी होऊन जात असतं. म्हणून आपल्या भावना आपल्याला नेहमी संतुलित/ नियंत्रित ठेवता आल्या पाहिजेत. घटना जितकी आहे जशी आहे तेवढीच असावी, ठेवावी. ती उगीच मोठी करु नये. ज्या गोष्टीं इतरांनी करु नयेत असं आपल्याला वाटतं, त्या गोष्टीं आपल्याला टाळता यायला हव्यात. अट्टाहास आणि अपेक्षा यात खूप फरक असतो. एखादी गोष्ट केलीच पाहिजे असं म्हटलं कि च चा विळखा सुरु होतो. आणि एकदा या विळख्यात अडकलं कि बरीच गुंतागुंत वाढत जाते. आपली धारणा बदलली किंवा नव्याने तयार झाली कि मग च चा विळखा आपल्या भोवती पडत जातो. अपेक्षा असल्या तरी त्या काळवेळ बघून संयमाने मृदू आवाजात सांगता यायला हव्यात. समोरच्या व्यक्तीला त्याचा बोजा वाटू नये याची काळजी घेता आली पाहिजे. निरपेक्ष, संपूर्ण, अंतिम, १००% असं खरं म्हणजे काहीही अस्तित्वात नसतं. आयुष्य किंवा मन म्हणजे रसायनशास्त्र नसतं. थोडंसं इकडं तिकडं होणारच. कारण प्रत्येक व्यक्ती जशी भिन्न असते तसं तिच्या भावनाही भिन्न असतात. याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवीय.
स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे. तरच स्वतःसाठी ध्येयं (Goals) ठेवता येतात. कित्येक स्त्रियांना तुमची ध्येयं काय विचारलं तर सगळं नवरा, मुलं, घर, नातेवाईक यांची वर्णी लागलेली दिसते. स्व कुठे फारसा दिसत नाही. हा स्व अहंकारातला नसतो. स्वतःला प्राधान्य असेल तर ध्येयामधेही स्वतःला घेता येतं. पुरुषांच्या बाबतीत चित्र थोडं वेगळं बघायला मिळतं. काही ठिकाणी तर फारच विचित्र. इतकं कि सगळीकडे फक्त स्व असतो, इतर कुणाला त्यात थाराही नसतो.
घडून गेलेल्या घटनेची ताकत जास्त असेल तर परिणामही त्या प्रमाणात होत असतात. बोलताना तर्काला धरून बोलावं. घटना घडल्यावर काही दिवसांनी त्याची प्रासंगिकता/ समर्पकता (Relevance) काय आहे याचा विचार करावा. मग त्यातील अनावश्यक गंभीरता कमी होते. उदा. एखाद्या राजकीय नेत्याला अटक झाली तर कुणाच्याही दैनंदिन जीवनात फरक पडत नसतो. पण चर्चा करताना जवळचे मित्र असले तरी अगदी हमरीतुमरीवर येत असतात. नेते पक्ष बदलून किंवा काहीही करून त्यांच्या खुर्चीची कायमता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. १५ दिवसांनी, महिन्याने, ६ महिन्यांनी किंवा वर्षभराने त्या बातमीचा आपल्या दैनंदिन जीवनाशी किती संबंध उरतो? प्रासंगिकता शून्य…! मग नको ते दोषारोप करून वाद घालणारे मित्र नक्की काय कमावतात, काय साधतात, काय सिद्ध करतात? निष्पत्ती काहीही नसताना मैत्र्य पणाला लावणं योग्य असतं का? यांचा विचार केला गेला नाही कि अविवेक सुरु होऊन त्यातून एकमेकांचे मूड्स जात राहतात. प्रत्येक बाबतीत आपल्याला मत असायलाच पाहिजे का? Why I m answerable to everybody??? काही विषय सोडून देता आले पाहिजेत. बऱ्याच वेळा आपण स्वतःलाच हाताळत (Manipulate) असतो. आपली प्रतिमा खराब करून घेणं म्हणजे आपला पराभव झाला असं समजलं जातं. यातून विवेक कमी होत जातो. तुलना किंवा स्पर्धा (Comparison & Competition) यातून मन:स्वास्थ्य बिघडतं. तुलना करायची असेल तर काळाप्रमाणे स्वतःची करावी ना! काल माझे विचार कसे होते, आज कसे आहेत? काळ आणि अनुभवानुसार त्यात प्रगल्भता आली आहे का याचा विचार व्हावा. आरोप करणं, दोष देणं, खरडपट्टी करणं, मूल्यमापन करणं, एखाद्याची लायकी काढणं वगैरे बंद करता यायला हवंय. कारण या सगळ्यातून अविवेक जन्माला येतो. वादविवादामुळे (Disputation) अडचणी वाढत जातात. आणि नातेसंबंध बिघडतात. का आणि कसं हे प्रश्न स्वतःला सहसा विचारू नयेत. कारण त्याच्याशी भूतकाळ निगडित असतो. भूतकाळातून फक्त शिकायचं असतं. वर्तमान काळाला प्राधान्य देता आलं पाहिजे. घटना घडून गेल्यावर आता काय करता येईल, यातून कसा मार्ग काढता येईल असे प्रश्न स्वतःला विचारता आले पाहिजेत. स्वतःच स्वतःला प्रश्न विचारल्याशिवाय मानसिक परिपक्वता कशी येणार?
परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानसिकता नसली कि भयंकरीकरण (Horribalisation) केलं जातं. स्वतःचा तोल (Control) गेला कि मग अरे बापरे, अशक्य, हॉरीबल असे शब्द आपल्या तोंडातून बाहेर येतात. “मला सहन होत नाही”, या मागे ‘कमी सहनशीलता असल्यामुळे येणारी निराशा’ (Low Tolerance Frustration) असते. फक्त माझा विचार का करायचा? आपण आपल्या भावनांना अति महत्व देऊन विनाकारण त्याचाच प्रचार (Hype) करतो. आणि पुन्हा त्यातच गुरफटून जातो. कोणतीही भावना शेवटी दुःख देते म्हणून भावना ताब्यात ठेवायच्या असतात. त्यासाठी आपल्या चौकटी आपणच तोडायच्या असतात. तरच विवेक शाबूत राहू शकतो.
स्वतःचा मूड टिकवून ठेवण्यासाठी स्वतःचा संयम, सहनशीलता (Patience) चांगला ठेवणं जरुरीचं असतं. बौद्धिक आवाका जास्त असणारी व्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीला काही समजावून सांगत असते तेंव्हा दुसऱ्या व्यक्तीचा बौद्धिक आवाका थोडाफार कमी असेल तर तिला समजून घेणं अवघड जाऊ शकतं. हे सांगणाऱ्या व्यक्तीला कळणं जास्त गरजेचं असतं. अशा ठिकाणी संयम जास्त उपयोगी पडू शकतो. बौद्धिक विसंगतता (Intellectual Incompatibility) असंही म्हणता येईल. समाजात बऱ्याच दांपत्यामधे असं बघायला मिळतं. पण त्यांचेही संसार सुखाचे होत असतातच ना? म्हणून नेहमी समायोजित (Adjust) करु नये तर स्वीकृत (Accept) करावं. समायोजित करणं जड जाऊ शकतं ज्यात तुलना असते. पण स्वीकृत केल्यावर तयार मानसिकता साथीला असते.
असं सगळं भावनेच्या संदर्भात असलं तरीही त्यावर आपला काबू नसेल तर अविवेकातून स्वैरता निर्माण होते. दुखणं/ दुखावणं ओघाने येतंच. जिथं दुःख येतं तिथं मूड छान कसा राहणार? “तुमच्या बोलण्यामुळे आज माझा दिवस वाईट गेला, माझा स्वैपाक बिघडला, माझ्या कामात चुका झाल्या, माझी train चुकली, मी सगळीकडे उशीरा पोचलो”, वगैरे घडलेल्या घटनेला अवाजवी महत्व आपण स्वतःच देत असतो. आणि ती घडून गेल्यावर त्याचा प्रमाणाबाहेर विचार करत बसतो. त्यामुळे स्वतःचं मन:स्वास्थ्य बिघडून मूड जात असतो. म्हणजे मूड जायला कारण हे, ती घटना किंवा दुसरी व्यक्ती नसून आपण स्वतः असतो. म्हणूनच आपल्या भावनेच्या दोऱ्या कधीही इतरांच्या हातात द्यायच्या नसतात. अन्यथा ज्यांच्या हातात द्याल, त्यांच्या इशाऱ्यावर तुम्हांला कायम कठपुतळीसारखं नाचत रहावं लागतं. मग तुमचा मूड छान कसा राहणार सांगा बरं???

☺️🌹❤️
© डॉ. बी. व्ही. कुलकर्णी,
३० मार्च २०२३, पुणे ✒️.
9422010682.

 

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा