You are currently viewing राष्ट्रीय कबड्डीपटटू वैभव कदम या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

राष्ट्रीय कबड्डीपटटू वैभव कदम या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई

पोलीस दलात दाखल झाल्यानंतर केवळ नोकरी व व्यायामाचा सराव करणा-या एका राष्ट्रीय कबड्डी पट्टू तरुणाने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार आज सकाळीउजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.जय भवानी क्रीडा मंडळ करंजावडे हा स़्थानिक संघ,महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणारे व मुंबई उपनगर कबड्डी संघाचा माजी कर्णधार राष्ट्रीय खेळाडू वैभव कदम ( 34) या तरुणाने गळफास लावून आत्मह्त्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करंजावडे येथे राहत होता. आपल्या राहत्या घरातच त्याने गळफास लावून घेतला असल्याचं समोर आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून अनंत करमुसे मारहाण प्रकरणात पोलिस दलात त्याची चौकशी सुरू होती. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. वारंवार चौकश्या व पोलिसांचा ससेमीरा या बाबतीत वैभव कदम हे दैनंदिन त्रस्त होते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सीआरपीएफ पोलीस दलातील तरुणाने आत्महत्या केल्याचे समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. वैभव कदम यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा प्रार्थमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करीत असून याबाबत अधिक चौकशी सध्या सुरु आहे. एका राष्ट्रीय खेळाडूने अशा प्रकारे आपलं आयुष्य संपवल, हि चिंताजनक बाब आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव कदम हा तरूण आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्यामुळे घरातील इतर परिस्थिती ठीक होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा