You are currently viewing नगरसेवक उदय मांजरेकरांमुळे कुडाळात दिव्यांगांना निधी उपलब्ध  

नगरसेवक उदय मांजरेकरांमुळे कुडाळात दिव्यांगांना निधी उपलब्ध  

कुडाळ

सामाजिक कार्यकर्ते तसेच कुडाळचे नगरसेवक उदय मांजरेकर यांनी आपल्या प्रभाग १५ मध्ये नगरपंचायतीमार्फत नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यांना योजना राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले.
यामध्ये अपंग बांधव सदानंद महादेव कुंभार, तनुजा दीपक कुंभार, गीतराज केशव जाधव, ओमकार आबा कुंभार, श्यामसुंदर सोमाजी माजगावकर, अंकिता एकनाथ चव्हाण, सीमा चंद्रकांत चव्हाण, सायली सदानंद कुंभार, तुकाराम विश्राम मांजरेकर या सर्वांना
व्यवसायाचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, दाखले, कोटेशन आदी कागदपत्रे नगरसेवक मांजरेकर यांनी उपलब्ध करून देत लाभ मिळवून दिला. यावर्षीचे अनुदान कुडाळ नगरपंचायतीकडून लाभार्थ्यांना देण्यात आले. नगसेवक उदय मांजरेकरांच्या कार्याचे प्रभागातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा