You are currently viewing उन्हाळी सुट्टीत एमएससीआयटीच्या नवे फीचर्स शिका

उन्हाळी सुट्टीत एमएससीआयटीच्या नवे फीचर्स शिका

एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

 

कुडाळ :

 

तंत्रज्ञानात रोज नवनवीन बदल घडत आहेत. एमएससीआयटी या लोकप्रिय कोर्समध्ये अनेक नवी फीचर्स आली आहेत. भावी आयुष्यासाठी आणि कौशल्य विकासासाठी ती अत्यंत महत्वाची आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळी सुट्टीत ही नवी फीचर्स शिकून आत्मसात करा असे आवाहन एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी केले. ते कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, एसएस सीआयटी हा कोर्स अत्यंत लोकप्रिय आहे. आतापर्यंत १. २५ कोटी जणांनी तो पूर्ण केला आहे. आता हा कोर्स आणखी सुधारित झाला आहे. एकदा हा कोर्स केला की विद्यार्थ्याला वाटते, आपल्याला संगणक नीट चालवता येतो. पण आपल्याला मायक्रोसॉफ्टमध्ये केलेलं काम पॉवर पॉईंटमध्ये रूपांतरित करता येते का, सायबर सिक्युरिटीबद्दल आपल्याला काय माहित आहे? हरवलेले आपली सिमकार्ड आपण ब्लॉक करू शकतो का?सुरक्षित बँकिंग कसे करावे? लकी ड्रॉ पासून सावध कसे राहावे? अशा अनेक नव्या गोष्टी आहेत. त्या आपण शिकायला हव्यात. मोबाईलवर फेसबुक, व्हाट्स ऍप, इंस्टाग्राम चालवणे म्हणजे मोबाईल नीट हाताळणे नाही. तसेच फक्त मायक्रोसॉफ्ट आणि पॉवर पॉईंटमध्ये काम करणे म्हणजे संगणक प्राविण्य नाही.

नव्या एमएस सीआयटी मध्ये १२ नवीन कौशल्य आधारित अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. भविष्यात ती खूपच उपयुक्त ठरणार आहेत. ती शिकून घ्या. तंत्रज्ञान सध्या वेगाने बदलत आहे. सध्या आपण गूगल वापरतो. पण भविष्य चाट जीपीटीचे आहे. भविष्यात चित्र वेगळेच असणार आहे. त्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे. म्हणूनच येति उन्हाळी सुट्टी सत्कारणी लावा. आमच्या एमकेसीएलच्या कोणत्याही केंद्रात जाऊन नव्या कोर्सेसची माहिती घ्या आणि लाईव्ह डेमो पाहून घ्या, असे प्रणय तेली म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा