You are currently viewing कणकवली तेलीआळी येथील बंद फ्लॅट मधील स्टेशनरी साहित्य जळून अंदाजे ६ लाखाचे नुकसान

कणकवली तेलीआळी येथील बंद फ्लॅट मधील स्टेशनरी साहित्य जळून अंदाजे ६ लाखाचे नुकसान

कणकवली

कणकवली तेलीआळी येथील पाताडे कॉम्प्लेक्स येथील अष्टविनायक अपार्टमेंट तळमजल्यामधील नारायण सीताराम मयेकर,शरद मयेकर,मोहन मयेकर, दत्तप्रसाद कोरगावकर अशा चार मालकांचे एकत्र एका फ्लॅट मध्ये टेशनरी व अन्य वस्तू विक्रीचे साहित्य ठेवण्यात आले होते.याला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली.फ्लॅट बंद असल्याने त्याच प्रमाणे मध्यरात्र असल्याने आग लागलेली समजू शकली नाही.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शेजारील रामचंद्र दळवी हे खाली आले असता त्यांना धूर येत असल्याचे दिसताच त्यांनी मालक मयेकर यांना माहिती दिली.त्यांनी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना माहिती दिली. काही वेळातच १० नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे घटनास्थली दाखल झाले. त्यांनी कणकवली न. पं.च्या अग्नी शामक बंब तातडीने घटनास्थळी बोलावत ही आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र फ्लॅट बंद असल्याने आगीचा अंदाज न आल्याने व कंबर पट्टे,कपडे,रुमाल, टॉवेल व शालेय वस्तू असल्याने आग आतल्या आत भडकत गेली यामुळे सर्व साहित्य आगीत बेचिराख झाले होते.कणकवली शहरात पेट्रोल पंप नजीक तसेच इतर आठवडा बाजर करणारे हे व्यवसायिक होते. यांचे अंदाजे ६ लाख रु.किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याचे मालक मयेकर यांनी सांगितले.सदरची आग शॉर्ट सर्किट ने लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत होता.यावेळी नगरपंचायत कर्मचारी व पाताडे कॉम्प्लेक्स येथील रहिवाशांनी जळलेले साहित्य बाहेर काढण्यास मदत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा