You are currently viewing काँग्रेसचे विलास गावडे यांना मोठा धक्का..

काँग्रेसचे विलास गावडे यांना मोठा धक्का..

वेंगुर्लेतील समाधान बांदवलकरांचा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश…

 

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावचे समाधान बांदवलकर यांनी सावंतवाडी येथे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. सिंधुदुर्ग काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा वेंगुर्लेतील विलास गावडे यांचे कट्टर समर्थक म्हणून समाधान बांदवलकर तालुक्यासह जिल्ह्यात सर्व परिचित होते. बांदवलकर यांचा आजच्या शिवसेना प्रवेश म्हणजे विलास गावडे यांना मोठा धक्का असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. काँग्रेसच्या बऱ्याच कार्यक्रमात गावडेंसोबत समाधान बांदवलकर यांचा सहभाग असायचा.

समाधान बांदवलकर यांनी यापूर्वी वेंगुर्ला पंचायत समितीचे सदस्य म्हणून यशस्वीपणे काम केले असून सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी सहकारी पतपेडी, वेंगुर्लाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत तसेच सिंधुदुर्ग जिल्हा युवा भंडारी प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत.

आज झालेल्या प्रवेशामध्ये बांदवलकर यांच्यासह दाभोली उपसरपंच फिल्सुअनिता फर्नांडिस, तसेच सदस्य सिसीलीया मास्कारेनास, एकनाथ राऊळ, नरेश बोवलेकर, तमास डिसोझा आणि कार्यकर्ते जॉन मेंडोत्झा यांचा समावेश आहे. यावेळी शिवसेनेचे माजी पंचायत समिती सभापती सुनिल मोरजकर, वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, कोचरा सरपंच योगेश तेली जिल्हाप्रमुख अशोक दळवी, अनारिजन लोबो आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा