*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझी कविता…*
अनुभवाचे अमृत असते तावून सुलाखून निघते कविता
चार गोष्टी सांगून जाते जगण्याचे ते सार कविता….
तव्यावरी भाजते ती पोळी खरपूस म्हणती खाता खाता
असह्य चटके सोसत भाजत तावावरती उतरे कविता…
रडते कुढते आणि झगडते घुसळून लोणी होते कविता
कढता लोणी मडक्या मध्ये जाळावर पोळते कविता…
नाती गोती ठेच लाविती हळहळते गहिवरते कविता
राखेतून ती पुन्हा परंतू फिनिक्स होते पहा कविता…
प्रेमाचे घालता खत पण पर्णोपर्णी बहरे कविता
तेजोप्रभा सूर्याची पडता आनंदाने लहरे कविता…
चंद्रकिरणांची शीतलता साक्षात नर्मदा आहे कविता
अथांग सागर ढवळताच पण कधी लागते अवचित हाता..
प्रेमवनातील केवडाच ती ग्रहगोलांचे तेज कविता
प्रणय सागरी डुंबताच पण रोम रोमी फुलते कविता…
नव्या नवलाईच्या काळी मनातून पाझरते कविता
प्राणसख्याच्या भोवतीच ती भ्रमर होऊनी नाचे कविता..
अवचित सुटता हात सख्याचा सैरभैर बावरते कविता
जाता जाता जगण्याचा पण मंत्र देऊनी जाते कविता….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २६ मार्च २०२३
वेळ : दुपारी :२/५९
*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*
*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*
*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*
*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*
*🌐Advt Web link*
———————————————