You are currently viewing सावंतवाडी शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकर उपलब्ध करून द्यावा – ॲड. संजू शिरोडकर

सावंतवाडी शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकर उपलब्ध करून द्यावा – ॲड. संजू शिरोडकर

सावंतवाडी

सावंतवाडी शहरांमध्ये फेब्रुवारी ते जून पहिल्या आठवड्या पर्यंत बऱ्याच भागांमध्ये पिण्याची टंचाई भासते. त्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यापूर्वी सावंतवाडी नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाच्या गाडीमार्फत पाणीपुरवठा केला जायचा. सद्यस्थितीमध्ये सावंतवाडी नगर परिषदेमध्ये नवीन अग्निशमन बंब दाखल झाला आहे.
शासनाच्या नवीन निकषाप्रमाणे नवीन बंबाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाऊ शकत नाही. त्यामुळे शहरांमध्ये पाणी टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. तसेच अग्निशमन बंब हा आग लागल्यावर तातडीने आग विझवण्यासाठी सज्ज असावा लागतो. त्यामुळे तो वापरता येत नाही.
सध्या सणासुदीचे दिवस व लग्न सराईचे दिवस आहेत. या कारणास्तव आपण तातडीने प्राधान्याने तातडीची गरज म्हणून स्टेनलेस स्टील बॉडी असलेला किमान 5000 लिटर पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेला वॉटर टँकर सिक्स व्हिल (सहा चाकी) गाडीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून शहरवासीयांना पाणीपुरवठा नगरपरिषद्वारे होऊ शकेल, याबाबतचे निवेदन मान. नाम.रविंद्रजी चव्हाण, पालकमंत्री,सिंधुदुर्ग व मान. नाम. दीपकभाई केसरकर,शिक्षण व भाषा मंत्री यांना ॲड. संजू शिरोडकर, माजी अध्यक्ष, भाजपा, सावंतवाडी यांनी दिले.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा