You are currently viewing शालेय शिक्षणमंत्री नामदार दिपकभाई केसरकर यांची फोंडाघाट हायस्कुल,ज्यु. काॅलेजला भेट

शालेय शिक्षणमंत्री नामदार दिपकभाई केसरकर यांची फोंडाघाट हायस्कुल,ज्यु. काॅलेजला भेट

जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे यांनी केले स्वागत

सर्वतोपरी सहकार्य करण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन आश्वासन

फोंडाघाट

शिक्षणमंत्री नामदार श्री.दिपकभाई केसरकर यांनी फोंडाघाट हायस्कुल,ज्यु.काॅलेज,कला आणि वाणिज्य काॅलेजला भेट दिली. जिल्हाध्यक्ष श्री.संजयजी आग्रे यांनी त्यांचे स्वागत केले. दीपक भाईंच्य हस्ते सरपंच सौ.संजना आग्रे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सर्व पदाधिकारीआणि संस्थेचे सर्व सदस्य, विकास संस्थेच्या उपाध्यक्षांनी स्वागत केले तर राजु पटेल यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात केलेल्या सर्व मागण्यांना शिक्षण मंत्र्यांनी सहमती दर्शविली, आणि नुतन बांधकामासाठी २५ लाख रुपयांची मदत करतो असे आश्वासन दिले. संस्थेला काही कमी पडायला देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. रंजन चिके,अजित नाडकर्णी यांनी दीपक भाईचे स्वागत केले.आपण आणि अजित नाडकर्णी यांनी सावंतवाडी अर्बन बँक मध्ये एकत्र काम केले याची आठवण यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काढली. दिपक भाईंनी आपल्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून फोंडाघाट हायस्कुल,ज्यु.काॅलेज,कला आणि वाणिज्य काॅलेजला भेट दिली, त्याबद्दल जिल्हाध्यक्ष श्री.संजयजी आग्रे यांनी दीपक भाईंचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा