You are currently viewing राष्ट्रोळी मंदिरांनजीक गतिरोधक बसवा

राष्ट्रोळी मंदिरांनजीक गतिरोधक बसवा

नगरसेवक रामचंद्र मणेरीकर यांची मागणी*

दोडामार्ग

दोडामार्ग शहरात रस्ते थोडेफार सुस्थितीत झाले आहेत, यावर वाहनचालक भरधाव वेगाने वाहने हाकत आहेत,दोडामार्ग – बांदा राज्यमार्गावर तर वाहने नेहमीच सुसाट असतात, त्यात दोडामार्ग सावंतवाडा येथील राष्ट्रोळी मंदिरांनजीक गतिरोधकाची आवश्यक्यता असून बांधकाम विभागाने याठिकाणी लवकरच गतिरोधक घालावा अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगरसेवक रामचंद्र मणेरीकर यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, दोडामार्ग हायस्कुल, ज्युनियर कॉलेज याच ठिकाणी आहे यामुळे या रस्त्यावर नेहमीच रस्ता ओलांडण्यासाठी गर्दी असते यात वाहन चालक वेगात वाहने हाकत असल्याने अपघाताची शक्यता आहे तरी याठिकाणी गतिरोधक लवकरात लवकर बसवावा अन्यथा आपल्या रोषास बांधकाम विभागाला सामोरे जावे लागेल असेही ते म्हणाले.

बाजार पेठेतही रस्ता पूर्ण झालेला नाही त्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांनाही त्याचा त्रास होत आहे तरी हा रस्ता पूर्णत्वास न गेल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नगरसेवक रामचंद्र मणेरीकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा