You are currently viewing कणकवलीच्या सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा आवाज मध्यप्रदेशमध्ये घुमणार

कणकवलीच्या सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा आवाज मध्यप्रदेशमध्ये घुमणार

रामनवमी उत्सवानिमित्त मध्यप्रदेशमधील टिकमगढमध्ये होणार वादन

कणकवली

गुढीपाडव्यादिवशी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वादन पूर्ण करून विश्वविक्रम प्रस्थापित केलेले आणि आतंरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल गोव्यामध्ये ठसा उमटविलेले कणकवलीतील १५० स्त्री पुरुष कलाकारांचे सिंधुगर्जना ढोलताशा पथक मध्यप्रदेश मध्ये जाऊन वादन करणार आहे याचा सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करणाऱ्या पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथकातील वादकांसाठी गुढीपाडवा शोभायात्रेमध्ये घेतलेल्या उत्कृष्ट वेशभूषा आणि आकर्षक ढोल स्पर्धेचा निकाल २५ मार्च रोजी सायंकाळी घोषित करण्यात आला व बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मध्यप्रदेशसाठी रवाना होणाऱ्या वादकांना शुभेच्छांचा कार्यक्रम आयडीयल नर्सिंग स्कूल कणकवली येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.युवराज महालिंगे, जेष्ठ पत्रकार विजय गावकर,एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक प्रा. हरीभाऊ भिसे, अध्यक्षा सौ.सुरेखा भिसे, कार्याध्यक्ष सर्वेश भिसे, खजिनदार शुभम पवार,कृतिका सावंत पथक प्रमुख नितीन चव्हाण, उपपथक प्रमुख प्रज्ञेश निग्रे, महिला प्रमुख रीदा मन्सूरी,सिंधुगर्जनाचे पदाधिकारी आणि सर्व वादक तसेच वादकांचे पालक देखील उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी पथकाला यावेळी शुभेच्छा दिल्या आणि आभार प्रा. हरीभाऊ भिसे यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा