तळेरे: प्रतिनिधी
भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान वाडा,पालघर मार्फत कणकवली तालुक्यातील कासार्डे ज्यु. कॉलेजचे प्राध्यापक देवेंद्र देवरुखकर यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक तसेच कोरोना काळात केलेले विशेष कार्याची दखल घेऊन’ राज्यस्तरीय ‘शिक्षण रत्न’ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला महापौर प्रवीणाताई ठाकूर,आम. राजेश पाटील, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष अॅड. राजाराम मुकणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश भोईर, यांच्यासह सागर देशमुख, किरण थोरात, नगरसेवक सदानंद पाटील, डॉ. ऋतुजा भोसले आदी मान्यवरांसह देवरुखकर यांच्या पत्नी सौ सरीता देवरुखकर व मुलगा अभिजित देवरुखकर हेही उपस्थित होते.
हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच वर्तक सभागृह विरार मुंबई येथे पार पडला.
या पुरस्कारबद्दल सत्कारमूर्ती देवेंद्र देवरुखकर यांचे कासार्डे विकास मंडळ,मुंबईचे सर्व पदाधिकारी, कासार्डे प्रशालेचे प्राचार्य एम.डी.खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
कासार्डेचे देवेंद्र देवरुखकर यांना ‘शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान करताना आम.राजेश पाटील,महापौर प्रवीणाताई ठाकूर व इतर मान्यवर