You are currently viewing सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि शासकीय सेवेतील यशासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, लेखक कवी मकरंदजी दीक्षित यांना गुणगौरव पुरस्कार

सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि शासकीय सेवेतील यशासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, लेखक कवी मकरंदजी दीक्षित यांना गुणगौरव पुरस्कार

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे मा.अध्यक्ष आ.श्री.श्रीपालजी सबनीस सरांच्या हस्ते झाला गौरव.

*पुण्याचे जिल्हा न्यायाधीश आ.श्री.सुनील वेदपाठक सरांची सन्माननीय उपस्थिती.

शनिवार दि. २५ मार्च २०२३ रोजी कवी श्री संजय वेदपाठक लिखित *कधी-कधी* या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि शासकीय सेवेतील यश यासाठी *गुणगौरव पुरस्कार* सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री. श्रीपालजी सबनीस सरांच्या हस्ते देऊन माझा गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे जिल्हा न्यायाधीश आदरणीय श्री सुनील वेदपाठक सरांची सन्माननीय उपस्थिती लाभली.

हा सर्व सुवर्णयोग घडवून आणणारे , माझ्यावर पुत्रवत माया आणि प्रेम करणारे, सेवानिवृत्त आयकर अधिकारी, ज्येष्ठ ग्रामीण कथाकार, सुप्रसिद्ध साहित्यिक, आदरणीय श्री ब. ल. पोतदार सरांना किती धन्यवाद द्यावेत. सर मी आपला आणि श्रद्धेय सौभाग्यवती काकूंचा ऋणी आहे, कृतज्ञ आहे, आपण उभयतास वंदन.

या कार्यक्रमाचे आयोजक आमचे कवी मित्र प्रिय श्री संजय वेदपाठक यांनी हा अतिशय देखणा, सुरेख आणि हृद्य असा कार्यक्रम घडवून आणला त्यांचा आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचा मी ऋणी आहे, सर्वांचे मनस्वी धन्यवाद. संजयजी यांच्या काव्यक्षेत्रातील या दमदार शुभारंभासाठी त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!

मला वंदनीय असणारे आणि ज्यांनी माझ्यावर अपार माया केली असे महर्षी नगर पुणे येथील स्वर्गवासी श्री चंद्रकांत दादा पंडित यांच्या पावन स्मृतीला हा कार्यक्रम अर्पण करण्यात आला होता. वंदनीय दादांच्या स्मृती हृदयामध्ये चिरंतन असणार आहेत. हा पुरस्कार म्हणजे त्यांचा आशीर्वादच आहे अशी माझी श्रद्धा आहे.

हा कार्यक्रम आयोजित आणि प्रायोजित करणाऱ्या सर्व आदरणीयांचे मनस्वी धन्यवाद. माझ्यावर मनापासून प्रेम करणारे अनेक बंधु भगिनी, माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी, मला आशीर्वाद देण्यासाठी, माझं कौतुक पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी अतिशय आपुलकीने, प्रेमाने बहुसंख्येने उपस्थित राहिले त्या सर्वांचा ही मी अंत:करणा पासून ऋणी आहे.

आपला मुलगा अधिकारी व्हावा असं स्वप्न आयुष्यभर माझ्या वडिलांनी पाहिलं, हा गुणगौरव पाहण्यासाठी आज ते हयात नाहीत. पण ह्या आनंदाच्या क्षणी माझी प्रिय आई व्यासपीठावर उपस्थित होती ह्याचं मोल मी काय वर्णन करु? माझ्या सहजीवनात मला साथ देणारी माझी पत्नीही यावेळी सोबत होती.

माझे प्रिय वंदनीय जन्मदाते आईवडील, माझे सद्गुरू स्वामी श्री विद्यानंद महाराज, मला घडवण्यात ज्यांचं अनमोल योगदान आहे असे माझे दौंड येथील काका। श्री अशोक दीक्षित, आप्पा, माझे गुरुजन, शिक्षक, गुरुवर्य, मला साथ सोबत देणारे माझे अनेक सहृद मित्र, माझ्या कार्यालयीन शासकीय जीवनात साथ सोबत करणारे मला अमूल्य मार्गदर्शन करणारे, माझे वरिष्ठ अधिकारी, सहकारी मित्र, सखे, सोबती, माझ्यावर प्रेम करणारे माझे कुटुंबीय या सर्वांच्या चरणी हा पुरस्कार, हा सन्मान, हा गौरव, मी विनम्रपणे अर्पण करतो….इदं न मम…..

*मकरंद दीक्षित, कात्रज,पुणे*
9049811976

प्रतिक्रिया व्यक्त करा