कुडाळ :
आवळेगांवमध्ये काल भर दुपारी ११.३० वाजताच्या दरम्यान नदीकडील भागात काेणी अज्ञाताने आग लावल्याने सदर आग ही संपूर्ण जमिनीवरील करड पेटत ती आग श्री. सत्यवान कानसे यांच्या गाेठ्याला लागून गाेठा पूर्ण पणे जळून भस्मसात झाला व म्हैशीपण हाेरपळल्या! या गावातील शेतकरी श्री. सत्यवान गणपत कानसे यांच्या गाेठ्याला (गुरांच्या वाड्याला) आग लागून फार माेठे नुकसान झाले आहे. या आगीत त्यांच्या सहा म्हैशी बांधलेल्या हाेत्या. हा आगीचा भडका पाहून आरडा आेरड झाली. परंतु दरम्यानच्या काळात त्यापैकी एक माेठी म्हैस आगीत १००% भाजल्याने मरण पावली, अन्य २ म्हैशी पण ब-याच भाजल्या आहेत.व अन्य ३ वाचवण्यात यश आले. स्वत: सत्यवान लागलीच जीवाची पर्वा न करता गाेठ्यात शिरून म्हैशींंची दावी ताेडून वाचवल्या! यावेळी काहीनी संबंधित अधिकारी वर्गांना माेबाईल वरून कल्पना दिल्या वर साै. पूर्वा सावंत.सरपंच, उप सरपंच श्री. विवेक कुपेरकर, मा. श्री. विजय चव्हाण बिडिआे साहेब, तसेच पशुवैद्यकीय अधिकारी श्री. देसाई साहेब, मा. श्री. दादा साईल,कुडाळ तालुका भाजपा अध्यक्ष, देवेंद्र सामंत, मंडल सरचिटणीस व गावांतील श्री. विजय पवार, श्री. चंद्रहास सावंत, , श्री. अमित तावडे, श्री. आबा सावंत, श्री.महादेव सावंत व ईतर सर्व जवळ जवळ अर्धा गांव गाेळा झाला.प्रत्यक्ष दर्शनी हे दृश्य पहाता फार हळ हळ व्यक्त हाेत हाेती. या सर्वां समक्ष उपस्थित अधिकारी यांनी पंचनामा करण्या बाबत सरपंच,उप सरपंच यांना मार्गदर्शन पर सुचना दिल्या!