देवगड येथे आशा दिन उत्साहात साजरा !
देवगड
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत देवगड येथे आशा दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलनाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ . रविंद्र राठोड यांच्या हस्ते झाले.
या वेळी मार्गदर्शन करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र राठोड म्हणाले की आशा म्हणजे आरोग्य विभागाचा कणा असुन त्या”मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ती” राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील एक प्रमुख घटक. गावातूनच निवडली जाणारी आणि त्याला उत्तरदायी असणारी आशा, समुदाय आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणा यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते. ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आशाना प्रशिक्षित केले जाते. प्रजनन आणि बाल आरोग्य , सार्वत्रिक लसीकरण, रेफरल, लोकसंख्येच्या वंचित घटकांच्या, विशेषत: स्त्रिया आणि मुलांसाठी, आरोग्य सेवा पुरवणे, पोषण, मूलभूत स्वच्छता आणि आरोग्यविषयक पद्धती, निरोगी राहणीमान आणि विद्यमान आरोग्य सेवांबद्दल माहिती देणे अशी अनेक कामे आशा करत असते. तसेच कोविड १९ या साथीच्या आजारात आशानी खुप चांगले काम केल्याचे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र राठोड यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना कक्ष अधिकारी श्री . संतोष बिर्जे म्हणाले की कोरोना काळातील आशांचे काम महत्वपुर्ण आहे .आशांना शासकीय मदत देण्यासाठी आमचे प्रशासन सदैव त्यांच्या पाठीशी असेल असे मत मांडले .
यावेळी आशा स्वंयसेविका श्रीम.ढोके मॅडम मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की आरोग्य विभागाने आजचा आशा दिन साजरा करून आमच्या कला गुणांना वाव दिला तसेच सन्मानपत्र देऊन आमच्या कामांचा गौरव केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले .
या आशा दिन कार्यक्रमाची सुरवात कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांच्या गणरायांच्या स्वमधुर गाण्याने झाले.
यावेळी देवगड तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आशा प्रथम क्रमांक श्रीम . निलीमा सारंग , द्वितीय क्रमांक प्रज्ञा धोपटे , तृतीय क्रमांक रेश्मा कदम यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला .
यावेळी आशांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी रांगोळी व पाककला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र राठोड, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , आरोग्य सहाय्यक लिलाधर सोमजी , समुदाय आरोग्य अधिकारी डॉ . अर्चना मर्गज, तालुका समुह संघटक स्वप्निल झोरे , कनिष्ट सहाय्यक संजय महाले ,लेखापाल , प्रणिता राटूळ , टीबी सुपरवायझर रूचा वाळके ,. राजन पवार , कनिष्ट सहाय्यक चित्तरंजन बाणे , सांख्यिकी सहाय्यक सागर जाधव ,कृष्ठरोग तंत्रज्ञ कौशिक थोरावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देवगड मधील तालुका लेखापाल , तालुका समुह संघटक , सांख्यिकी सहाय्यक , निमवैद्यकिय कुष्ठरोग कर्मचारी , गटप्नवर्तक , आशा स्वयंसेविका आरोग्य सेविका ,आरोग्य सेवक आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य सहाय्यक .लिलाधर सोमजी, तर सुत्रसंचालन स्वप्निल झोरे यांनी केले.