केसरकरांचा पुढाकार; सामाजिक संघटनांचा पाठपुरावा यशस्वी…
सावंतवाडी
येथील कुटीर रुग्णालयाला अखेर औषध पुरवठा उपलब्ध झाला आहे. यासाठी सामाजिक संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून हा औषध पुरवठा उपलब्ध करून दिला आहे. याबाबत संबंधित सामाजिक संघटनेने त्यांचे आभार मानले आहेत. गेले काही दिवस कुटीर रुग्णालयात महत्त्वाची औषधे नसल्यामुळे अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता. पुरवठा असल्यामुळे समोर त्या ठिकाणी सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना बाहेरून औषधे लिहून द्यावी लागत आहे.
याबाबत पत्रकारांनी श्री. केसरकर यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. आज हा औषध पुरवठा करण्यात आला, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.