मालवण
सिंधु आरोग्य मेळाव्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. याशिबिराचा लाभ 157रुग्णांनी घेतला.या शिबीराचे उद्घाटन मालवण गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, महिला बालकल्याण अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी त्यांच्या सोबत आचरा सरपंच प्रणया टेमकर, तालुका आरोग्य अधिकारी शामराव जाधव, आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ कपिल मेस्त्री, डॉक्टर शिल्पा झाट्ये, डॉक्टर धुरी, डॉक्टर परब, डॉ. प्रणव पोळ, डॉ सावंत, डॉ पवार, डॉ बोधमवाड, डॉ साळकर, डॉ पळसंबकर आदी उपस्थित होते. या शिबीरात स्त्री रोग,अस्थी रोग, नाक, कान, घसा, त्वचा, नेत्र, दंत चिकित्सा आदी रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. याशिबिराचा आचरा प्राथमिक आरोग्य केंदा अंतर्गत गावातील एकूच 157 रुग्णांनी लाभ घेतला. यातील दोन रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कपिल मेस्त्री यांनी दिली.