You are currently viewing वेंगुर्ले-वायंगणी येथे २५, २६ मार्चला कासव महोत्सवाचे आयोजन – अमृत शिंदे 

वेंगुर्ले-वायंगणी येथे २५, २६ मार्चला कासव महोत्सवाचे आयोजन – अमृत शिंदे 

वेंगुर्ले

सावंतवाडी वनविभागाच्या वतीने २५, २६ मार्चला वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथे विविध उपक्रमांसह दोन दिवसाच्या कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी दिली.

पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच समुद्र किनाऱ्याला कमी अधिक प्रमाणात दुर्मिळ अशा समुद्री कासवांचा (ऑलिव्ह रिडले सी टर्टल) अधिवास आढळून येतो. साधारणतः दरवर्षी ऑक्टोबर ते मे या दरम्यान त्यांचा विनीचा हंगाम असतो. स्वच्छ कमी प्रदुषीत आणि कमी मानवी हस्तक्षेप असणाऱ्या किनाऱ्याची निवड ही कासवे अंडी घालण्यासाठी करतात. एका वेळी १०० ते १५० अंडी घालण्याची क्षमता ही मादी कासवांची असते. अंडी घातल्यानंतर मादी कासवे समुद्रात निघून जातात. त्यानंतर या अंड्यांच्या ५० ते ६० दिवसांच्या उबवण कालावधी मध्ये भटकी कुत्रे, कोल्हे, मुंग्या यांच्याकडून त्यांना धोका असल्याने त्याचे संरक्षण व संवर्धन सावंतवाडी वनविभाग, स्थानिक कासव मित्र, बीच मॅनेजर यांच्या मदतीने करत असतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा