मालवण :
पारंपारिक वेशभूषेतील भव्य दिव्यता, ढोल ताशांचां गजर, घोडे उंट यांचा सहभाग, वारकरी संप्रदायाची साथ, बच्चे कंपनीचा सहभाग, स्थानिक महिलांचे रोंबाट, यांसह खास आकर्षण स्वरूप असलेला गोवा बार्देश येथील शिमगोत्सव या सर्वांच्या साथीने मालवण शहरातून निघालेली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अर्थात भव्यदिव्य शोभायात्रेने मालवण नगरी बुधवारी दणाणून गेली.
आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. पंकज दिघे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भरड नाका येथे यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. प्रभु श्रीराम प्रतिमेसह सजलेल्या गाडीतून बबन शिंदे यांनी ध्वज हाती घेत शोभायात्रेची सुरवात केली.ही स्वागतयात्रा भरड येथून बाजारपेठ मार्गे बंदर जेटी, फोवकांडा पिंपळ ते मामा वरेरकर नाट्यगृह अशी काढण्यात आली.
या यात्रेत पारंपरिक हिंदू वेशातील तसेच भगवे फेटे परिधान करून महिला व पुरुष सहभागी झाले होते. तर बच्चे कंपनीने विविध पौराणिक व थोर पुरुषांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. उंट व घोडे यांच्यावर ऐतिहासिक व पौराणिक वेशभूषा केलेल्या मुलांनी स्वार होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वायरी येथील महिला वारकरी मंडळाने टाळ मृदंगाच्या तालावर भक्तिगीते सादर केली. तर तारकर्ली येथील भूषण जुवाटकर या तरुणाने आगळीवेगळी अशी निळ्या रंगात सागराची वेशभूषा करीत समुद्री कचऱ्याचा देखावा सादर करून सागरी जैवविविधता वाचविण्याचा संदेश दिला. दरम्यान, ही स्वागत यात्रा व रोंबाट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मालवणवासीय उपस्थित होते. यावेळी हजारो जनसमुदाया सोबत सर्वपक्षीय उपस्थित होते.
या यात्रेत आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, दत्ता सामंत, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, महेश कांदळगावकर, हरी खोबरेकर, बबन शिंदे, धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, भाऊ सामंत, सौरभ ताम्हणकर, मंदार केणी, यतीन खोत, शिल्पा खोत, सन्मेष परब, सेजल परब, बाबी जोगी, किरण वाळके, बाबा मोंडकर, बबन परुळेकर, उमेश मांजरेकर, राजू बिडये, ललित चव्हाण, शेखर गाड, दिलीप बिरमोळे, राजा गावकर, किसन मांजरेकर, पंकज सादये, गणेश कुडाळकर, अंजना सामंत, महेश जावकर, पूजा करलकर, प्रमोद करलकर, मोहन वराडकर, मंदार ओरसकर, भाई कासवकर, तपस्वी मयेकर आकांक्षा शिरपुटे, सीया धुरी, विजय नेमळेकर, मुकेश बावकर, सुरेश बापर्डेकर, महेश सारंग, सूर्यकांत फणसेकर आदी सहभागी झाले होते.
महिलांचे रोंबाट सादरयावेळी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य महिला ग्रुपतर्फे महिलांचे रोंबाट सादर करण्यात आले. यामध्ये अनेक महिला, तरुणी व लहान मुलांनी पौराणिक पात्रे साकारत या यात्रेत रंगत आणली. या यात्रेत यावर्षी प्रथमच गोवा बार्देश येथील बार्देश शिमगोत्सव समितीचे रोंबाट आयोजकांकडून आमंत्रित करण्यात आले. यात्रेत सहभागी झालेल्या या रोंबाटमधील ढोलताशा वादक व कलाकारांनी पताका नाचवत पारंपारिक गीते व नृत्ये सादर केली.
*संवाद मिडिया*
*निसर्गाच्या सान्निध्यात आपले🏠 घरटे… म्हणजेच 🌴 *वृक्षवल्ली गृहप्रकल्प*🌴*
*Advt link👇*
————————————————–
🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠
आता कोकणच्या मध्यभागी असलेल्या आलिशान प्रकल्पाचा एक भाग व्हा… आणि 🌴निसर्गाच्या निर्मळ 🏡 सौंदर्याचा स्वीकार करा…😇
निसर्गाच्या सान्निध्यात आपले🏠 घरटे… म्हणजेच 🌴 *वृक्षवल्ली गृहप्रकल्प*🌴
🏠 *वृक्षवल्ली गृहप्रकल्प*🏡 मळगाव – सावंतवाडी.. आपल्याला मिळत आहे निसर्ग रम्य वातावरणात राहण्याची सुवर्णसंधी..😍
*गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या मुहूर्तावर 📝बुकिंग केल्यास आकर्षक सुट..💫*😍
💁♂️ *ऑफरचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधा..*📱
🏘️ *तीन भव्य प्रकल्पाच्या यशानंतर.. *”2BHK फ्लॅट इमारत”* चा 🏬 *चौथा प्रकल्प* लवकरच ग्राहकांकरिता..🥳🤩
👉 *वैशिष्ट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि 😍आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप आपल्याला 💁♂️येथेच पाहायला मिळेल..*😇
*महा रेरा रजिस्ट्रेशन नं. – P52900046973*
💫 *आपल्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्ये* 💫
👉 सावंतवाडी रेल्वे स्टेशन 🚆५ मिनिटाच्या अंतरावर
👉मुंबई-गोवा महामार्ग 🛣️आणि मळगाव बाजारपेठ १.० किमी अंतरावर😇
👉 सावंतवाडी शहर ५.० किमी अंतरावर 🌃
👉 मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट🛬 २२ किमी अंतरावर🛩️
👉 वेंगुर्ला शहर 🌇आणि समुद्रकिनारा २२ किमी🏖️ अंतरावर
👉 शिरोडा समुद्रकिनारा २२ किमी अंतरावर🏖️
👉 तारकर्ली समुद्रकिनारा ५१ किमी अंतरावर 🌊
👉 आंबोली पर्यटन क्षेत्र 32 किलोमीटर अंतरावर🥶
*मग आता वाट कसली पाहताय..🤔 आजच आपल्या हक्काच्या 🏠 वास्तूची बुकिंग करा..📝*
🏢 *पत्ता – वृक्षवल्ली, मळगाव, रेल्वे स्टेशन जवळ, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग*
📱 *संपर्क – 9421268100 / 7588270707*
*—————————————————–*
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*