You are currently viewing घुशी

घुशी

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे लिखित लेख*

*घुशी*

आपणांस परिचयाचा असणारा हा प्राणी पूर्वी गावांत चिखल मातीची घर मुबलक धान्य पिकत होते. त्यामुळे अन्न धान्य खराब करणारे उंदीर. घुशी . सारखे प्राणी असायचे घराला घुस लागली तर मोठ नुकसान होणार हे शंभर टक्के आपण बघितले आहे मोठमोठी घर. वाडे. यांना घुशी लागल्यामुळे जमीनदोस्त झाले आहेत . लोकाना भयाकींत करणारे हे सर्व प्राणी आहेत. घुस हा प्राणी जमीनीला मोठमोठी बिळ पाडतात आणि पूर्ण घर. त्याचा पाया कमकुवत करतात. सर्व माती बाहेर काढतात या मध्ये यांचा कोणताही स्वार्थ नसतो ** पूर्वी लोक म्हणायचे घुस रात्रभर उकरते सोन आहे म्हणून उजाडताच तीच्या ध्यानात येत सर्व मातीच आहे.
आज मानवरुपी मोठमोठ्या घुशी तयार झाल्या आहेत. त्यांनी शासकीय. निमशासकीय. प्रशासकीय. ग्रामपंचायत. नगरसेवक . नगरपालिका. महानगरपालिका. सरपंच. राजकीय. सामाजिक. धार्मिक. आर्थिक. वैयक्तिक. वैद्यकीय. अशा सर्व भ्रष्टाचार. लाचखोरी. करणारे अशा प्रकारच्या मानवाच्या रुपातील घुशी आज तयार झाल्या आहेत.
बांधकाम कामगार यांना वेगवेगळ्या ३२ योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी . आपल्या आर्थिक स्वार्थापोटी बोगस कामगार नोंदणी करणारे हे बांधकाम कामगार योजनांच्या लाभातील मोठा आर्थिक वाटा काढणारे. हया सुध्दा घुशी आज बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचा पाया कमकुवत करत आहेत.
बोगस डॉक्टर. बोगस औषध. रुग्ण नियमानुसार उपचार नाही. कोणत्याही आजारांवर उपचार करण्यासाठी दरपत्रक नाही. विविध आरोग्य टेस्ट जसं रक्त लघवी. व इतर टेस्ट करणारी दुकाने. रुग्णांना व्यवस्थित वागणूक नाही. अशा बोगस लोकानी जेवढी घुस वेगात कमकुवत करत नाही त्यापेक्षा वेगाने आज गोरगरीब लोक. सर्वसामान्य लोक. यांना पूर्ण आर्थिक. मानसिक. पोखरुन काढलें आहे.
‌ सर्वात महत्वाचा आणि गोरगरीब जनतेचा हक्काचा घास म्हणजे रेशन यामध्ये मोठमोठ्या अधिकारी कर्मचारी रेशन दुकानदार. या नावाच्या घुशी आज शासकीय लोकांच्या हक्काच्या अन्न धान्य यावर डल्ला मारत आहेत. दुकानदार शिधापत्रिका धारकांना व्यवस्थित वागणूक देत नाही. वेळेवर दुकान उघडले जात नाही. धान्य किडलेले. मुंग्या. घाण. असणारे वितरण केले जाते. युनिट प्रमाणे धान्य वाटप नाही. धान्य काळाबाजारात डबल पैशाने विक्री. आणि हा सर्व प्रकार पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांच्या देखरेखीखाली चालतो अबब केवढ्या मोठ्या घुशी आहेत ह्या.
आज शासकीय आणि निमशासकीय महसूल. तलाठी. ग्रामसेवक. तहसिलदार. पोलिसप्रमुख. यांच्या ध्यानात येणारा व रासरोस चालणारा अवैध गौण खनिज उपसा त्यामध्ये माती. वाळू. मुरुम. हे आज अवैध उपसा सर्वत्र सुरुच आहे यामुळे आपल्याला अन्न पुरविणारी व मयत व्यक्तीला जागा देणारी माती घर. व अन्य जीवनावश्यक गरजा मातीच पूर्ण करत असते पण आज हीच माती नेते खासदार आमदार मंत्री अधिकारी व कर्मचारी यांनी तयार केलेले तस्कर यांच्यामुळे धोक्यात आली आहे. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या सर्व संसाधनांपैकी माती ही सर्वात महत्त्वाची आहे. माती आपल्याला अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या पोषण प्रदान करते. आम्ही इतर गोष्टींबरोबरच वनस्पती, औषधी वनस्पती आणि लाकूड देखील घेतो. माती ही पृथ्वीच्या पृष्ठभागाला व्यापून टाकणारा कणिक कणांचा पातळ थर आहे.
ते पृथ्वीशी अतूटपणे जोडलेले आहे. जमिनीचा प्रकार जमिनीच्या स्वरूपावर अवलंबून असतो. जमिनीवर आढळणाऱ्या खडक आणि खनिजांपासून मिळणारे खनिजे आणि सेंद्रिय पदार्थ माती बनवतात. हे हवामान प्रक्रियेच्या परिणामी तयार होते. सुपीक माती ही खनिजे आणि सेंद्रिय पदार्थांच्या योग्य संयोगाने बनलेली असते.
माती ही पृष्ठभागावरील खडक, हवामान, हवामान आणि वनस्पती यांच्याशी संवाद साधणाऱ्या लाखो उपपृष्ठावरील जीवाणू आणि कृमींचे अंतिम उत्पादन आहे. या भौतिक, रासायनिक आणि जैविक प्रक्रिया या सर्व मातीच्या स्तराच्या दीर्घकालीन निर्मितीमध्ये सामील आहेत.
इतर गोष्टींबरोबरच खडकांचे प्रकार, जमिनीचे भौतिक गुण, हवामान आणि वनस्पति या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी फरक आहेत. हे स्पष्ट करते की ग्रहाच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्रकारच्या माती का आढळतात. या फरकाचा परिणाम म्हणून आपल्याला विविध प्रकारची पिके, गवत आणि झाडे मिळतात. आदर्श परिस्थितीत एक ते दोन मिलिमीटर जाडीचा मातीचा थर तयार होण्यासाठी सुमारे दोन हजार वर्षे लागतात.
माती विविध प्रकारच्या घन, द्रव आणि वायूपासून बनलेली असते. हे पृथ्वीच्या कवचाच्या शीर्षस्थानी आढळू शकते. त्यात जाणीव आणि जड दोन्ही रसायने असतात. खनिज कण, कुजणारे वनस्पतींचे तुकडे, सूक्ष्मजीव आणि असंख्य जीवाणू माती तयार करण्यासाठी सेंद्रिय पदार्थांवर खाद्य देतात.
जमिनीतही पाणी असते, ज्यामुळे झाडांच्या मुळांना हायड्रेशन मिळते.
राज्यातील वाळू तस्कर व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणार्‍यांना चाप बसवण्यासाठी त्यांच्यावर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटी (एमपीडीए) कायद्यातील अधिनियम १९८१ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने या अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या या कायद्यानुसार दराेडेखाेरांवर कारवाई केली जाते. आज माती. वाळू. दगड. मुरुम. काढणारे तस्कर यानी तहसिलदार . ग्रामसेवक. तलाठी. यांच्या अंगावर गाड्या घालणे. शिव्या देणे. धमकी. प्राणघातक हल्ला. हे वेळोवेळी होतंच असतं आम्ही या सर्व प्रकारचा सर्वे केला त्यावेळी आमच्या असं लक्षात आले की शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा वाळू. माती. मुरुम. दगड. उचल करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार पैसे भरुन सुध्दा अधिकारी कर्मचारी यांना टेबलखालून भला मोठा आर्थिक वाठा द्यावा लागत आहे. आणि तो वेळेवर मिळला नाही तर अधिकारी व कर्मचारी याच तस्करांना विविध कारणानें बदनाम करत आहेत म्हंजे सर्वात मोठ्या घुशी ह्याच आहेत.
राज्यात बहुतांश ठिकाणी वाळू तस्करी, अवैध उत्खननाचे सर्रास प्रकार सुरू आहेत. बर्‍याच वेळा संघटितपणे वाळूचे अवैध उत्खनन करून तस्करी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच त्यांना राेखण्याचा प्रयत्न करणार्‍या महसूल अधिकारी- कर्मचार्‍यांवर वाळू तस्करांकडून संघटितरीत्या हल्ला करण्याचा, जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनाही गेल्या काही वर्षांत घडलेल्या आहेत. त्यामुळे या ‘एमपीडीए’ कायद्याच्या अधिनियमातील नावाच्या सुधारणेसह ‘वाळू तस्कर’ आणि ‘वाळूची तस्करी’ या दोन संज्ञांची व्याख्या करून त्यांना कलम २ मध्ये अंतर्भूत करण्यात आले आहे. अधिनियमातील या सुधारणेमुळे वाळूचे अवैध उत्खनन आणि बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यास पायबंद घालण्याच्या दृष्टीने कडक उपाययोजना करण्यात येतील. तसेच वाळू तस्करांना मदत करणार्‍यांवरही कारवाई केली जाणार आहे.
एक वर्षाची शिक्षा
जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणार्‍यांवरही ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करण्यासाठी या अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या सुधारणेनुसार काळाबाजार करणार्‍या व्यक्तींच्या व्याख्येचा समावेश ‘एमपीडीए’ कायद्यातील अधिनियम १९८१ मध्ये करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणार्‍यांसाठी पूर्वी असणारी सहा महिने स्थानबद्धतेची तरतूद या सुधारणेमुळे आता एक वर्ष कालावधी
बहे. बोरगाव. मसुचिवाडी. नृसिंहवाडी. शिरटे. या नदीकाठच्या भागातून आज बेमाफी माती उपसा केला जात आहे त्यासाठी ग्रामपंचायत यांची सुध्दा आपल्या गावात होणारे वाळू. मुरुम. माती. दगड. यांचे होणारे उत्खनन यासाठी शासनाने लिलाव प्रक्रिया राबविली आहे कां?? शासन नियमानुसार उत्खनन किती ब्रास साठी आहे. ?? शासन नियमानुसार तया गौण खनिज याचे पैसे भरले आहेत कां?? उत्खनन सुरू असताना कोण अधिकारी त्यावर देखरेख करतो कां?? मूळ लिलाव एक हजार ब्रासचा आहे आणि जागेवर रात्रंदिवस बेमाफी उपसा केला जातो त्यावर शासन नियंत्रण आहे कां?? शासकीय अधिकारी व कर्मचारी संपावर असतानासुद्धा उपसा सुरु कसा होता ?? कुणाच्या देखरेखीखाली सुरू होता ?? नियम 2014 मधील महत्‍वाच्‍या तरतुदी
नियम (10) ग्रामसभेच्‍या स्‍थायी समित्‍या, (शांतता, मादकद्रव्‍य, नियंत्रण, न्‍याय साधन संपत्‍ती नियोजन व व्‍यवस्‍थापन )
नियम (14) ग्रामसभाकोष
नियम (18) शांतता समिती
नियम (21) साधन संपत्‍ती नियोजन व व्‍यवस्‍थापन समिती
नियम (23) भु व्‍यवस्‍थापन गांवाच्‍या भू अभीलेखे योग्‍य अचूक नोंदी आहे का ?  याचा आढावा घेणे / धनकोच्‍या जमीन गहाण संबंधातील सर्व प्रकरणाची माहिती ग्रामसभेसमोर ठेवावी.
नियम (24) जमीनीचे अन्‍य संक्रमणास प्रतिबंध
MLRC Code 1966 मधील तरतुंचा भंग करून व्‍यवहार झाला असल्‍याची ग्रामसभेची खात्री झाल्‍यास त्‍याचा तपशिल नमुद करून ठराव सक्षम अधिका-याकडे पाठवेल.
नियम (25) अन्‍य संक्रमण केलेली जमीन परत करण्‍याचा ठराव सक्षम अधिका-याकडे पाठविणे
नियम (26) (2) भुसंपादन व पुर्नवसन बाबत शिफारस
नियम (28) जलस्‍त्रोत नियोजन व व्‍यवस्‍थापन
नियम (28) जलस्‍त्रोत नियोजन व व्‍यवस्‍थापन
नियम (32) गौण खनिज लिलाव व पटटा देण्‍यापूर्वी ग्रामसभेची शिफारस अनिवार्य
नियम (36) मादक द्रव्‍य पदार्थाचे विनियमन
नियम (37) नविन दारू / मादक पदार्थ निर्मीती करीता परवानगी घ्‍यावी लागेल
नियम (40)  Excise Dept. ला कोणत्‍याही वर्षी दारूचे दुकान चालू ठेवण्‍यासाठी सभेकडे प्रस्‍ताव दयावा लागेल.
दारू दुकाने बंदचा ग्रामसभेस अधिकार
नियम (41) गौण वनोत्‍पादन व्‍यवस्‍थापन ग्रामसभेकडे ( कापणी / निविदा / विक्री )
नियम (43) बाजारावर नियंत्रण
नियम (44) सावकारी व्‍यवहार नियंत्रण समिती
नियम (45) लाभार्थी निवड ग्रामसभेमार्फत
नियम (46) योजना / प्रकल्‍प यांना मान्‍यता
नियम (48) निधी वापर प्रमाणपत्र ग्रामसभेस अधिकार
‌अवैध माती वाळू मुरुम दगड उत्खनन आज मोठ्याप्रमाणात सुरू आहे. या क्षेत्रात भयानक अशी यंत्रसामग्री कार्यरत आहे. डंपर. ट्रॅक्टर. जे सी बी. पोकलॅन. अशा वाहनांचा सर्रास वापर होत आहे. रस्त्यावर माती वाळू मुरुम दगड वाहतूक करणारी वाहने यांच्या गलथानपणा पणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी कोण जबाबदार आहे. रात्रभर वाहनांमुळे लोकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. मोठ्याप्रमाणात होणारा माती उपसा यामुळे नदीकाठ खचणयास सुरुवात झाली आहे. माती तुटत तुटत गावाकडे यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे नदीला येणारा पूर व त्यांचे पाणी गावांत घुसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकांचे मोठ नुकसान झाले आहे होत आहे.
माती विकून पैसा मिळविणारे आज विटभटटी मालक झाले आहेत दारात सायकल नवहती आज वाहनं लावण्यास जागा नाही. अलिशान महागड्या गाड्या. बंगले. शेती. अवैध सावकारी अशा मार्गाला हा सर्व पैसा जातो आहे. यासाठी शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी आणि सर्व गौण खनिज उत्खनन करणारे हया सर्वात घुशी आहेत यांना वेळेवरच आवर घालणे गरजेचे आहे नाही तर हे सर्वजण मिळून सर्व मानवी जीवन धोक्यात आणतील बघायला माती मिळणार नाही. बघायला डोंगर मिळणार नाही. बघायला नदीत वाळू मिळणारं नाही. निसर्गाला सर्वात मोठा धोंका याच घुशी पासून आहे.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे 9890825859

_______________________________
*संवाद मीडिया*

*👉मोफत समुपदेशन….मोफत समुपदेशन …*

*”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने*

*” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी*

🔹रत्नागिरी तालुक्यातील इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी, यांच्या वतीने *_”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने “_* १२ वी नंतर विविध क्षेत्रातील सुवर्ण संधींवर मार्गदर्शन हा मोफत समुपदेशन कार्यक्रम *_शुक्रवार , दिनांक २४ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:००_* या वेळेत *मराठा भवन मंगल कार्यालय* ,जिल्हा परिषदे जवळ , रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे .

*प्रमुख वक्ते :प्रा .विजय नवले (करिअर पाथ निर्मिती मध्ये विश्वविक्रम करणारे तज्ञ )*

🔹या कार्यक्रमासाठी मोफत नाव नोंदणी खालील गुगल फॉर्म लिंक द्वारे करावी .

https://forms.gle/Sv7pZYtT9X1Lw2F18

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था*
*कॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वूमेन*

*📲संपर्क क्रमांक :*

*९४२०२७४११९*
*७९७२९९७५६७*

*Advt link …👇*

*————————————–*

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा