You are currently viewing प्राण्यांना शुद्ध पाण्यासाठी” कणकवली शहरात 50 भांडी ठेवणार

प्राण्यांना शुद्ध पाण्यासाठी” कणकवली शहरात 50 भांडी ठेवणार

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या पुढाकारणे व डॉ. प्रसाद धुमक यांच्या सहकार्याने कणकवलीसाठी 50 भांडी

कणकवली

कणकवलीतील मोकाट प्राण्यांना शुद्ध पाणी मिळावे या साठी नगरसेवक सुशांत नाईक यांच्या पुढाकारणे व प्राणीमित्र डॉ. प्रसाद धूमक यांच्या सहकार्याने कणकवली टु-व्हीलर असोशियन यांच्याकडे 50 भांडी सुपूर्त करण्यात येणार आहेत. यासाठी वॉटर फॉर व्हाईसलेस या संस्थेची मदत होत आहे.

सध्या प्रचंड उष्णता वाढली आहे. जसे मनुष्याला पाण्याची गरज असते तशी प्राण्यांनाही पाण्याची गरज असते. त्याची तहान भागविणे आपले कर्तव्य आहे. कणकवली शहरात मोकाट जनावरे, प्राणी भटकत असतात. पावसाळ्यात त्यानां कुठेही पाणी उपलब्ध होते. मात्र आताच्या कडाडाच्या उन्हाळ्यात प्राण्यांना पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. प्राण्यांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नगरसेवक सुशांत नाईक प्राणीमित्र डॉ.प्रसाद धुमक व वॉटर फॉर व्हाईसलेस या संस्थेची मदत होत आहे. आज ही पाण्याची भांडी टु-व्हीलर असोशियन कणकवली च्या सर्व सभासदांकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी अध्यक्ष सलीम शेख, उपाध्यक्ष प्रशांत बाणे, सचिव महेश चिंदरकर खजिनदार पांडुरंग गावडे प्रमुख सल्लागार नितीन तावडे, प्रथमेश परब, संदीप पारकर, किशोर कांबळे, गणेश सावंत, योगेश बाईत, दशरथ चव्हाण,अमोल सावंत, आदी टु-व्हिवर असोशियन कणकवली चे सभासद उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा