सिंधुदुर्गनगरी
भारतीय जनता पार्टी ओरोस मंडळ व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने २३ मार्च रोजी गोविंद सुपर मार्केट मैदान ओरोस येथे शिगमोत्सव रोम्बाट २०२३ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. काही वर्षापूर्वीचा ओरोस हा छोटासा खेडेगाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्यालयामुळे विस्तारला असून सिंधुनगरी या शहराकडे या गावाने वाटचाल केली आहे! या गावच्या विकासात अनेक नेतृत्वांचे हातभार लागले असून या नेतृत्वाची आठवण करून देणारा सोहळा व त्यानिमित्ताने शिगमोत्सव रोबाट २०२३ हा कार्यक्रम होत आहे.
भारतीय जनता पार्टी ओरोस मंडळ व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित शिगमोत्सव रोबाट २०२३ या कार्यक्रमात नेरुर गावचे व स्थानिक लोक कलाकार नृत्य , हलते देखावे दाखविले जाणार आहेत. यावेळी जेष्ठ नागरिक, जिल्हा मुख्यालय योगदान व्यक्ती, पत्रकार यांचे सत्कार केले जाणार आहेत. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे. यावेळी माजी खासदार निलेश राणे, विशाल परब, ओरोस सरपंच आशा मुरमुरे ,ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, राजन तेली, भाई सावंत, प्रभाकर सावंत, सुप्रिया वालावलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन अमोल ग्रुप ओरोस यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ओरोस अर्थात सिंधुनगरी च्या या शहरात दरवर्षी सातत्याने येथील एक अतुलनीय नेतृत्व संतोष वालावकर व सुप्रिया वालावलकर ही उभयता विविध कार्यक्रम कल्पकतेने करत असतात. नागरिकांचे मनोरंजन व्हावे याचबरोबर सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक परंपराही ते जपत असतात. कधी सिंधू महोत्सव तर कधी सांस्कृतिक महोत्सव तर कधी नववर्षाचे स्वागत अशा अनेक कार्यक्रमांमधून येथील नागरिकांशी चांगला सुसंवाद ठेवला आहे. यावेळी त्यांनी शिगमोत्सव रोबाट चे आयोजन करून येथील नागरिकांसाठी मनोरंजनाचे दालन खुले केले आहे