बिळवसच्या महिला देश पातळीवर चमकाव्यात – सरपंच मानसी पालव
मसुरे / बिळवस :
सध्याच्या आधुनिक युगात प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे आज काळाची गरज आहे यासाठी बिळवस ग्रामपंचायतीच्या वतीने येथील महिलांना जे जे सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य आपण देणार आहोत. आज महिला सर्व क्षेत्रात पुढे जात आहेत हे आम्हा सर्वांना अभिमानाचा आहे. या गावातील महिला देश पातळीवर विविध क्षेत्रात कर्तुत्ववान कामगिरी करून चमकाव्यात. अशा सर्व कर्तुत्ववान महिलांना जर आपण बळ दिलं तर आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल असे प्रतिपादन बिळवस येथे बोलताना सरपंच मानसी पालव यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बीळवस ग्रामपंचायत च्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच मानसी पालव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावरती अनुपमा सूर्यकांत पालव, रंजना पालव, ग्राम विकास अधिकारी युगल प्रभू, अंजली पालव, अमृता पालव,चैताली पालव,कृषी अधिकारी श्री गोसावी, प्रकाश फणसेकर, संतोष पालव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला त्यामध्ये अश्विनी भोगले, नीलम भोगले ,सुषमा पालव, अनुपमा पालव, इंदुमती पालव, प्रज्ञा फणसे, अंकिता मेस्त्री, क्रांती तोरस्कर सानिका श्रीराम पालव, सानिका सदाशिव पालव , क्रांती लक्ष्मण पालव या कर्तुत्ववान महिलांचा ग्रामपंचायत च्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कृषी अधिकारी श्री गोसावी म्हणालेत महिलांसाठी आज विविध शासकीय योजना असून या योजनांचा लाभ महिलांनी घेऊन पुढे येणे गरजेचे आहे. यासाठी पंचायत समिती पातळीवरती आम्ही सर्व ते सहकार्य करण्यास नेहमी तयार आहोत बिळवस ग्रामपंचायत चा आजचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून सर्वांसाठी आदर्श असा आहे. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार ग्रामसेवक युगल प्रभू गावकर यांनी मानले.