*पारंपारिक कार्यक्रमाची मोठी रेल चेल*
तळेरे / प्रतिनिधी :
गुढीपाडव्याचे औचित्य नववर्षाच्या स्वागतासाठी कासार्डे व तळेरे येथे आज बुधवारी दि २२मार्च रोजी सकाळी ९ वा. भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरच्या शोभायात्रेचा कासार्डे तिठा येथून शुभारंभ होणार असून, पदयात्रा करीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरुन तळेरे येथे प्रस्थान करणार आहे. तसेच या शोभायात्रेत तळेरे येथील एसटी स्टँड समोरील पुलाखाली लाठी-काठी, बनाटी, दांडपट्टा यासारख्या अनेक पारंपरिक खेळांचे, कलांचे सादरीकरण होणार आहे.
यामध्ये कासार्डे-तळेरे पंचक्रोशीतील लेझीम पथक, चित्ररथ देखावे, वारकरी भजने, ढोल पथक, बैलगाडी वरील देखावे आणि ट्रॅक्टर वरील देखाव्यांचाही समावेश असणार आहे.
तरी पंचक्रोशीतील जास्तीत जास्त लोकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नववर्ष स्वागत शोभायात्रा समिती कासार्डे- तळेरे पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आले आहे.