मालवण
निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त मौनिनाथ महाराज ट्रस्ट मालवण मार्फत उद्योजकता संवाद मेळावा दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला लघु सूक्ष्म मध्यम मंत्रालया अंतर्गत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता .या मेळाव्याला खादी ग्रामोद्योग मंत्रालयाचे श्री.उदय बराटे , श्री.संतोष भाईर, कॉयर बोर्डचे श्रीनिवास ,लघु सूक्ष्म मध्यम मंत्रालयाचे श्री.डी आर जोहरी ,लिड बँक मॅनेजर श्री.मुकेश मेश्राम नाबार्डचे श्री.अजय बुटे ,प्रधानमंत्री मत्स्य खात्याचे श्री हिमांशू कदम व वैभवी देसाई व खेमराज सावंत हे अधिकारी उपस्थित होते .
सर्व अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आयोजक श्री. विजय केनवडेकर यांनी सर्वांचे स्वागत केले . सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्यातील संपूर्ण योजनाची माहिती दिली. उद्योग आधारची व सामूहिक व्यवसाय व सेवा डी.आर. जोहरी यांनी संपूर्ण माहिती देऊन उद्योग आधारची नोंदणी करून देण्यात आली. श्री उदय बराटे यांनी खादी ग्रामोद्योग ची कोणतीही कर्ज योजना व नोदणी याची माहिती देऊन KVIC कर्ज प्रकरण करताना कोणत्याही प्रकारची फि आकारली जात नसून कर्ज प्रकरण पूर्णपणे ऑनलाईन करता येते .याची विस्तृत माहिती देण्यात आली. नाबार्डचे श्री. अजय बुटे यांनी शेतकरी बांधवांना आवश्यक असणाऱ्या योजना आणि त्यासाठी आवश्यक असणारी कर्जपुरवठा शेळी मेंढीपालन कुक्कुटपालन याची विस्तृत माहिती देण्यात आली. बँकेमध्ये अडकलेली कर्ज प्रकरणे का प्रलंबित राहतात यांचे मार्गदर्शन श्री.मुकेश मेश्राम यांनी करून काही कर्ज धारकांना आवश्यक असणाऱ्या माहिती करून देऊन ताबडतोब त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली. मत्स्यसंपदा योजनेत सामूहिक मत्स्यपालन यासाठी खाडी पात्रात मोठा प्रकल्प करण्यास मोठी संधी असून जास्तीत जास्त लाभार्थीने त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले . सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत महिलांच्या लहान लहान उद्योगासाठी आवश्यक योजना यांची माहिती देऊन काही महिला गटांना यासंबंधी प्रकल्प तयार करण्यास मार्गदर्शन मेळाव्यात मदत करण्यात आली. कॉयर बोर्ड मार्फत केरळ येथे होणाऱ्या प्रशिक्षणास काथ्या पासून उद्योग उद्योजकांना मोफत प्रशिक्षण देण्यात येईल . मालवण मधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये प्रत्येकी वीस लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले .अनुसूचित जाती जमाती हब मध्ये अनुसूची जाती जमातीतील उद्योजकांना तरुणांना उद्योगांमध्ये समाविष्ट व प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारच्या योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शंभर तरुणांना वेगवेगळ्या कोर्सचे प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यत लावण्यात येणार आहे .त्याचा फायदा घेण्याचे आव्हान करण्यात आले . त्याचबरोबर जे प्रशिक्षण घेणार आहेत त्यांना पन्नास हजार रुपयांची टुलकिट आवश्यक हत्यारे मोफत देण्यात येणार आहेत . अशा विविध योजनांचा संपूर्ण माहिती देऊन त्यानंतर आवश्यक ती माहिती पत्रे सर्वांना देण्यात आली .या कार्यक्रमाला श्री धोंडी चिंदरकर , श्री महेश मांजरेकर ,श्री. ललित चव्हाण, सौ पूजा करलकर ,सौ पूजा सरकारी ,सौ ममता वराडकर सौ.महानंदा खानोलकर ,सौ शर्वरी पाटकर ,श्री नारायण धुरी, श्री मोहन वराडकर ,श्री सुनील बागवे ,श्री.नरेंद्र जामसांडेकर,श्री.नंदू देसाई, श्री चंदू आचरेकर, विक्रांन्त नाईक .जॉन न्हरोन्हा उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौनीनाथ महाराज ट्रस्ट अध्यक्ष गणेश कुशे यांनी केले .