-जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते
सिंधुदुर्गनगरी
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअतंर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 1 लाख 58 हजार 749कुटुंबांना राज्य शासनाच्यावतीने 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली आहे.
‘आनंदाचा शिधा’ मध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश आहे.हे शिधाजिन्नस प्रति शिधापत्रिकाधारकांना ई पॉस प्रणालीव्दारे प्रति संच 100 रुपये दराने वितरीत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये गोदाम निहाय शिधाजिन्नस संच्याचा पुरवठा पुढीलप्रमाणे आहे. गोदामाचे नाव सावंतवाडी -25 हजार 175, दोडामार्ग -9 हजार 54, वेगुर्लां- 16 हजार 257, कुडाळ- 29 हजार 345, कणकवली -26 हजार 537, मालवण- 12 हजार 534, आचरा, 9 हजार 120, देवगड, 11 हजार 666, विजयदुर्ग 9 हजार 702, वैभववाडी- 9 हजार 359 असे एकूण 1 लाख 58 हजार 749 शिधा पत्रिकाधारकांना आनंदाच्या शिधा संच्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.