You are currently viewing माविमच्या महिला बचत गटांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन 24 ते 27 मार्चला जेटी बंदर, मालवणात

माविमच्या महिला बचत गटांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन 24 ते 27 मार्चला जेटी बंदर, मालवणात

– जिल्हा समन्वय अधिकारी  नितीन काळे

सिंधुदुर्गनगरी

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून सन 2023 हे साजरे करण्यात येत आहे. (नवतेजस्विनी) महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माविम बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक 24 ते 27 मार्च 2023 असे एकूण 04 दिवस जेटी बंदरमालवण याठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे यांनी दिली.

             या प्रदर्शनाचे उद्घाटन दि.24 मार्च 2023 रोजी दुपारी 1 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून)अन नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाणयांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात येणार आहे.

                महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) (महाराष्ट्र शासन अंगीकृत) जिल्हा कार्यालय या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील गरीबगरजूमागासवर्गीयविधवापरितक्ताभूमिहीन महिला अल्पभूधारक महिला व वंचित महिलासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य करीत आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग मध्ये माविम अंतर्गत ग्रामीण भागात 136 गावात1 हजार 14 बचत गटांच्या माध्यमातून एकूण 11057 महिला तसेच शहरी भागात 58 वार्डात 275 बचत गटांच्या माध्यमातून एकूण 2849 महिला असे एकूण 13916 महिलांचे संघटन करण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा