कुडाळ
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचे पडसाद आता जनतेमधूनही उमटू लागले आहेत. या संपामुळे सर्वसामान्य जनता व शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यास आमचा विरोध नाही परंतु त्याचा भार सर्वसामान्य जनतेवरच येणार आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. आणि सरकार संघटनात्मक ताकदीला बळी पडत आहे. मुलांच्या शिक्षणावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे तसेच जनतेची कामे रखडली आहेत, म्हणूनच बेरोजगाराना नियुक्ती देऊन विद्यार्थ्यांची व जनतेची गरज आहे याकडे मनसेचे माजी कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी पत्रकार परिषदेत लक्ष वेधले.सिंधुनगरी येथील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेला मनसेचे पदाधिकारी कुणाल किंनळेकर,अमोल जगले उपस्थित होते.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे त्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी डीएड बेरोजगाराना शाळांवर समाविष्ट करण्यात यावे जुन्या पेन्शनला आमचा विरोध नाही परंतू संप करून जनतेला वेठीस धरू नये सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे त्यामुळे सरकार कडून दखल घेतली जात नाही याचा अर्थ सरकारचा बाहेरून पाठींबा असल्याचेच स्पष्ट होत आहे असा आरोप , प्रसाद गावडे यांनी केला.
श्री गावडे पुढे म्हणाले की जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे या संपाला आमचा विरोध नाही लोकशाही मध्ये कुणालाही आपल्या मागण्या मांडता येतात जुनी पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर पत्रकार व इतर सर्व घटकातील लोकांना पेन्शन मिळाली पाहिजे परंतु आपल्या मागण्यासाठी जरूर लढावे जनतेला वेठीस धरू नये कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहून आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करावा म्हणजे जनता भरडणार नाही
कर्मचारी संपाचा थेट परिणाम मुलाच्या शिक्षणावर झाला आहे या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित करत मुलाचे शैक्षणीक नुकसान टाळण्यासाठी डीएड बेरोजगारांना शासनाने शाळेवर समाविष्ट करून घेण्यात यावे अशी आग्रही मागणी आहे पंधराव्या वित्त आयोगातून तशी घेण्याची तरतुदही आहे एरवी आउट सोर्सने भरती केली जाते त्या पद्धतीने डीएड बेरोजगारांची भरती करण्यात यावी आधीच कोरोना काळात दोन वर्षे मुलाचे शैक्षणिक नुकसान झाले आहे आणि आता परीक्षाचा काळ आलेला असताना शिक्षक संपावर गेल्याने मुलाचे शैक्षणिक नुकसान होत आहे हे नुकसान टाळण्यासाठी शासन व प्रशासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत
आठ दिवस झाले तरी शासन सपाची दखल घेत नाहीत सर्व कामे खोळंबली आहेत शेतकऱ्यांची कामे थांबली आहेत तरी देखील शासन गंभीर नाही शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून संपाच्या बाबतीत गंभीर न होता सरकारचा बाहेरून पाठींबा असल्याचे दिसत आहे वरिष्ठ अधिकारी सुद्धा बघ्याची भूमिका घेत आहेत त्यामुळे जनतेची सर्व कामे थांबलेली आहेत
पंचायत समितीच्या आवारात आंदोलन करायला सर्वसामान्य नागरिकांना परवानगी दिली जात नाही मग कर्मचाऱ्यांना परवानगी कशी दिली हा प्रश्न आहे तसेच जिल्ह्यात जमावबंदीआदेश लागू आहेत अशावेळीही सर्वसामान्य नागरिकांना आंदोलन करण्याला परवानगी दिली जात नाही मग कर्मचाऱ्यांना आंदोलने,मोर्चा काढायला पोलिसांनी परवानगी कशी दिली ?सर्व सामान्य लोकांना जे नियम आहेत ते कर्मचाऱ्यांसाठी लागू नाहीत का? असा सवालही मनसेचे माजी कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी उपस्थित केला आहे.
*संवाद मिडिया*
🚒🚒 *बोअरवेल क्षेत्रांतील खात्रीशीर नाव*🚒🚒
*💧एल.एम. बोअरवेल💧*
🏞️ *३०० फूट लांब, मोठे होल ६”(इंच)बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करून मिळेल.*
*💁♂️ *१००% कामाचा हमी हीच आमची ओळख*
💧💧💧💧💧💧💧💧💧
*💦 ४.५”, ६”, ६.५”, ९*
*💦बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*💦बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*💦पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*💦अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*💦नवीन पंप बसवून मिळतील.*
*बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*💦 होल मारून मिळतील.*
*💦 बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एल.एम.बोअरवेल*
*📌आमचा पत्ता : हुंबरट टीठा, मुंबई गोवा हायवे, कणकवली, जि.सिंधुदुर्ग*
*📌 चिंतामणी पार्क, एस एम हायस्कूल समोर, कणकवली, सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. लवू परुळेकर*
*संपर्क 👇*
*📱*9420741599 / 8669193749*
*Advt link*
———————————————-