*राकेश तळगांवकर यांना कलारत्न पुरस्कार प्रदान*
*तेजस फाऊंडेशन नाशिक यांच्याकडून राज्यातल्या विविध मान्यवरांचा सन्मान*
छत्रपती संभाजीनगर (गुरुदत्त वाकदेकर) :
तेजस फाऊंडेशन नाशिक यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र संभाजीनगर, (औरंगाबाद) येथे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ३१ मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.
या कार्यक्रमास डॉ. ऋषिकेश कांबळे (ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक), राजू मोरे (अभिनेते – दिग्दर्शक), डॉ. बाबुराव देसाई (ज्येष्ठ साहित्यिक नाशिक), नाथकुमार घोलवड (कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर), महेंद्र तुपे (लेखक कवी) तसेच तेजस फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मेघा डोळस आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर पुरस्कार्थींमध्ये मुंबईच्या राकेश तळगांवकर यांना “कलारत्न पुरस्कार” उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
राकेश तळगांवकर हे हौशी रंगभूमीवर कार्यरत सर्वांच्या परिचयाचं एक नाव. राकेश तळगांवकर वीस वर्षांहून अधिक काळ मराठी रंगभूमी, साहित्य, चित्रपट, दूरदर्शन मालिका, जाहिरात अशा विविध क्षेत्रात अभिनयासह दिग्दर्शन, लेखन, सूत्रसंचालन, कास्टिंग दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, डिझायनर म्हणून कार्यरत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी यांच्या राज्य नाट्य स्पर्धा, कला विषयक महोत्सव, पुरस्कार सोहळे, कला कार्यशाळा, शिबिर अशा विविध उपक्रमांमध्ये समन्वयक म्हणून कार्यरत असतात. एक उत्तम समन्वयक म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामासाठी समन्वयक म्हणून त्यांनी तीन वर्षे काम पाहिलेले आहे. कामाक्षी क्रिएटिव्ह या त्यांच्या संस्थेमार्फत ते विविध कलाविषयक उपक्रम आयोजित करत असतात.
राकेश तळगांवकर यांनी २००२-०३ साली फक्त लढ म्हणा या संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि मिलिंद पेडणेकर दिग्दर्शित नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. त्यानंतर अजब तुझे सरकार, सत्य शरणम ही त्यांनी काम केलेली इतर काही प्रमुख व्यावसायिक नाटके आहेत. याशिवाय वाचडियो, सती, सरहद, गर्भकुष्ठकिचा, सॅटर्डे नाईट फिव्हर, सॅल्यूट, पुरुषार्थ, चिन्ना अशा महत्त्वाच्या हौशी रंगभूमीवरील नाटकांतून तसेच एडव्होकेट शालिनी, इंद्रधनुषी, चार दिवस सासूचे, कालाय तस्मै नमः, कीर्ती, माया, डिटेक्टीव्ह रागिणी, सखे शेजारिणी ब्रम्हाडनायक अशा मराठी मालिकातून अभिनय केला आहे.
*पुरस्कार्थींची नावे पुढील प्रमाणे:-*
१) सदानंद नारायण सुर्वे, वाशिम – आदर्श शिक्षक पुरस्कार
२) प्रा. सुनील रामचंद्र पाटील, अमळनेर – आदर्श शिक्षक पुरस्कार
३) प्रवीण एस. वाघमारे, कल्याण – आदर्श पत्रकारिता पुरस्कार
४) सुरेश भाऊ डोळस, पुणे – कलारत्न पुरस्कार
५) डॉ. संदीप जयवंतराव गायकवाड, नाशिक – सामाजिक शैक्षणिक पुरस्कार
६) मोनिका कमलाकर तरमाळे, ठाणे – आरोग्य पुरस्कार
७) मनीषा चिंतामणी आवेकर, पुणे – मैदानी खेळ सामाजिक कार्य पुरस्कार
८) भारत तातेराव मानकर पांगरी, जालना – समुद्र जीवन रक्षक पुरस्कार
९) संजय रघुनाथ बाविस्कर, छत्रपती संभाजीनगर – समाजसेवा, आरोग्य पुरस्कार
१०) रवींद्र काशिनाथ पाटील, नाशिक – शैक्षणिक सामाजिक कार्य पुरस्कार
११) रफिक शेख, जळगाव – सामाजिक कार्य पुरस्कार
१२) सिद्धार्थ सान्दु, नाशिक – कलारत्न पुरस्कार
१३) अजय शिवाजी तारगे, नाशिक – कलारत्न पुरस्कार
१४) राकेश तळगावकर, मुंबई – कलारत्न पुरस्कार
१५) वैशाली सोमनाथ लांडगे, पुणे – सामाजिक साहित्यिक शैक्षणिक पुरस्कार
१६) माधुरी राजेंद्र गुजर, भुसावळ – शैक्षणिक पुरस्कार
१७) प्रा. गणेश पोपटराव खोसरे, छत्रपती संभाजीनगर – ऊत्कृष्ट लेखक पुरस्कार
१८) बाळासाहेब गणशिराम जगताप, छत्रपती संभाजीनगर – आदर्श शिक्षक पुरस्कार
१९) कृष्णा दगडू पवार, छत्रपती संभाजीनगर – आदर्श शिक्षक पुरस्कार
२०) सविता बाजीराव निकम, मालेगाव – आदर्श शिक्षिका पुरस्कार (अंध व्यक्ती)
२१) शैलेश रमेश राणे, जळगाव – आदर्श शिक्षक पुरस्कार
२२) डॉ. प्रा. बापूराव देसाई, नाशिक – साहित्यिक शैक्षणिक कार्य पुरस्कार
२३) सीमा गोवर्धन दाभाडे, नागपूर – सामाजिक कार्य कलारत्न पुरस्कार
२४) श्रद्धा विजय देवचक्के, छत्रपती संभाजीनगर – कलारत्न पुरस्कार
२५) प्रमोद शिंदे, उल्हासनगर – समाजभूषण पुरस्कार
२६) डॉ. गणेश तुकाराम पुंडे, पुणे – साहित्यिक समाजभूषण पुरस्कार
२७) हिरामण कचरू मनोहर, मनमाड – आदर्श पत्रकार पुरस्कार
२८) शक्ती निरंजन दाणेज, नाशिक – उत्कृष्ट कारागीर, विणकर पुरस्कार
२९) शंकर देविदास चव्हाण, जळगाव – आदर्श शिक्षक पुरस्कार
३०) सुवर्णा मंगेश जोशी, छत्रपती संभाजीनगर – कलारत्न पुरस्कार
३१) प्रभाकर बेगाजी खिल्लारे, छत्रपती संभाजीनगर – राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार
*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*
*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*
*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*
*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*
*🌐Advt Web link*
———————————————