कुडाळ
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून काढण्यात आलेली महाप्रबोधन यात्रा काल सिंधुदुर्गात दाखल झाली. या यात्रेत माजी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के, राज्य सैनिक सेलचे जेष्ठ मार्गदर्शक कर्नल संभाजी पाटील, प्रसिद्ध राजश्री शाहू महाराज व्याख्याते तथा उच्च न्यायालयाचे मेडियटर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
या यात्रे निमित्ताने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शरद कृषी भवन ओरोस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी अनेक वक्त्यांनी लोकनेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शताब्दी महोत्सव वर्षां निमित्ताने त्यांच्या जीवन पटावर आधारित मनोगत व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवगड, वैभववाडी, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष,बावतीस फर्नांडिस,काका कुडाळकर आत्माराम ओटवणेकर भास्कर परब,नझीर शेख,प्रभाकर पवार, कणकवली विधानसभा अध्यक्ष अभिनंदन मालऺडकर, रूपेश जाधव, अनंत पिळणकर, निलेश गोवेकर, कणकवली शहर अध्यक्ष निखिल गोवेकर, दिवाकर परब, अभय बापट,सुरज खान, डॉ,सेल जिल्हाध्यक्ष डॉ संजीव लिंगवत,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर, सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष प्रा,सचिन पाटकर, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर,कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर,विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष ॲड,प्रतीक सावंत, सहकार सेल जिल्हाध्यक्ष उत्तम सराफदार,देवेन पालव,निलेश पेडणेकर,समृद्धी शरद धुरी,सिद्धी विवेक बोभाटे,संजना विजय परब,प्रमोद कांडरकर,शैलेश कांबळी,सुजन खोबरेकर, चंद्रकांत नाईक,पुंडलिक दळवी, सत्यवान साटेलकर,योगेश कुबल यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.