डीएड धारकांना न्यायची केली मागणी; पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात..
सावंतवाडी
स्थानिक डीएड धारकांना न्याय मिळालाच पाहिजे भूमिपुत्रांना हक्काच्या नोकऱ्या मिळालाच पाहिजे या मागणीसाठी आज ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढत निर्देशना केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली.
दरम्यान या आंदोलनाची चुनूक लागतात सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ केसरकर यांच्या निवासस्थानाला संरक्षण देत आंदोलन करताना ताब्यात घेतले. संबंधित आंदोलकांवर प्रतिबंधक कारवाई करत सोडून देण्यात आले.
यावेळी मंदार शिरसाट, गुणाजी गावडे ,पंकज शिरसाट, मदन राणे, संदीप महाडेश्वर, राजू गवंडे, सागर बोगटे ,रुपेश खडपकर,मनीष तोटेकर, गुरु गडकर, आदी उपस्थित होते