You are currently viewing कनिष्ठ डॉक्टरांची सहनशीलता संपली

कनिष्ठ डॉक्टरांची सहनशीलता संपली

*सेवानिवृत्तीचे वय ६४ परिपत्रक मागे न घेतल्याने बेमुदत उपोषण*

*सामूहिक राजीनामा देण्याची तयारी; तोडगा न निघाल्यास ‘भूक हरताळ’*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

काही ठरावीक डॉक्टरांची मर्जी राखण्यासाठी प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय ६४ केल्याने शेकडो कनिष्ठ डॉक्टरांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे जारी केलेले प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय ६४ हे परिपत्रक मागे घेण्यात यावे यासाठी ४ मार्च रोजी पालिका मुख्यालयातील आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. त्यावेळी आयुक्तांनी पुढील ७ दिवसांत चर्चा करून परिपत्रक मागे घेण्याचे आश्वासन दिले होते; मात्र १५ दिवस उलटले, तरी अन्यायकारक परिपत्रक मागे न घेतल्याने कनिष्ठ डॉक्टरांची सहनशीलता संपली असून, डॉक्टरांच्या शिक्षक संघटनेने आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

शेकडो कनिष्ठ डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंगळवार २१ मार्चपासून आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही निर्णय न घेतल्यास सर्व रुग्णालयात चक्काजाम, त्यानंतर भूक हरताळ आणि टोकाची भूमिका म्हणजे सामूहिक राजीनामा देण्याची तयारी, असा इशारा कनिष्ठ डॉक्टरांच्या शिक्षक संघटनेचे सचिव डॉ. रवींद्र देवकर यांनी दिला आहे.

*आंदोलनाचे स्वरूप:-*

■ धरणे आंदोलन २१ मार्च, सकाळी ९.३० वाजता
■ साखळी बेमुदत उपोषण
■ सर्व रुग्णालयात ठिय्या चक्का जाम आंदोलन
■ शेवटचा उपाय म्हणून ३० मार्चपासून सामूहिक राजीनामे देणार
■ एप्रिलपासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलन
■ कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवणार

 

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

*👉मोफत समुपदेशन….मोफत समुपदेशन …*

*”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने*

*” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी*

🔹रत्नागिरी तालुक्यातील इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी, यांच्या वतीने *_”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने “_* १२ वी नंतर विविध क्षेत्रातील सुवर्ण संधींवर मार्गदर्शन हा मोफत समुपदेशन कार्यक्रम *_शुक्रवार , दिनांक २४ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:००_* या वेळेत *मराठा भवन मंगल कार्यालय* ,जिल्हा परिषदे जवळ , रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे .

*प्रमुख वक्ते :प्रा .विजय नवले (करिअर पाथ निर्मिती मध्ये विश्वविक्रम करणारे तज्ञ )*

🔹या कार्यक्रमासाठी मोफत नाव नोंदणी खालील गुगल फॉर्म लिंक द्वारे करावी .

https://forms.gle/Sv7pZYtT9X1Lw2F18

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था*
*कॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वूमेन*

*📲संपर्क क्रमांक :*

*९४२०२७४११९*
*७९७२९९७५६७*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =