नवी दिल्ली
नागरिकांचा रेल्वे प्रवास सुखकर आणि आरामदायी होण्यासाठी आयआरसीटीसी प्रवाशांसाठी नवनवे बदल केले आहेत. तसेच प्रवासा दरम्यान चांगला अनुभव मिळावा यासाठी रेल्वेच्या कोचमध्ये देखील सुधारणा केल्या आहेत. रेल्वे तिकिट बुकिंगमध्ये देखील नवे बदल करण्यात आले आहेत. त्यातच आणखी एक नवा बदल आयआरसीटीसीने केला आहे. तो म्हणजे आता रेल्वे प्रवाशांना आपल्या कन्फर्म तिकिटावरील प्रवाशाचे नाव बदलता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे अनेक प्रवाशांचा अचानक रेल्वे रद्द झाल्यानंतरचा होणारा त्रास कमी होणार आहे.
अनेकदा प्रवासाच्या आधी काही कारणास्तव आपल्याला आपला रेल्वे प्रवास रद्द करावा लागतो, कधी रेल्वेच्या काही समस्यांमुळे प्रवास रद्द होतो यावेळी तिकिट कॅन्सल करण्यासाठी प्रवाशांना अतिशय कटकटीला सामोरे जावे लागते.
या सर्वांपासून सुटका करण्यासाठी आयआरसीटीसीने हा नवा बदल केला आहे. ज्यात तुम्ही ऑनलाईन पद्धतीने प्रवाशाचे नाव बदलू शकता. मात्र ही सुविधा काही ठराविक लोकांसाठीच देण्यात आली आहे.
पाहा याबाबतचे नियम:
1. जर तो प्रवासी सरकारी सेवेत असेल वा तो कोणत्या अधिका-यासोबत कामानिमित्त यात्रा करत असेल तर 24 तासाआधी तो आपले नाव बदलू शकतो.
2. प्रवासाआधी 24 तास अगोदर प्रवाशाने जर रेल्वेला लिखित स्वरुपात अर्ज केला की माझे आरक्षित सीट माझ्या कुटूंबाच्या अन्य सदस्याला भाऊ, बहिण. वडिल, आई, मुलगा, पत्नी यांच्या नावे करावे तर तिथे नाव बदल करता येऊ शकते.
3. जर प्रवासी कोणत्या मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेचा विदयार्थी असेल आणि तो 48 तास आधी रेल्वेला लिखित स्वरुपात अर्ज करेल की आपली सीट कोणत्या विद्यार्थ्याच्या नावे केली जावी.
4. जर तुम्ही शुभकार्यासाठी जात असाल तेव्हा तुम्हाला 48 तास आधी लिखित स्वरुपात आपल्या जागा त्या कार्यक्रमातील अन्य व्यक्तीला दिली जावी अशी नावासह सगळी माहिती रेल्वेला द्याल.
5. जर तुम्ही नॅशनल कॅडेट कोर चे सदस्य असाल तर तुम्ही 24 तास आधी नाव बदलण्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे.
6.सर्वात शेवटी आणि महत्त्वाचे म्हणजे यात्री केवळ एकदाच आपली रेल्वे सीट कोणा अन्य व्यक्तीच्या नावे करु शकतो. जर प्रवाशांच्या एकूण संख्या 10% पेक्षा अधिक असेल तर नावात बदल करता येणार नाही.