You are currently viewing डेरवण येथील नेमबाजी स्पर्धेत पाच जणांचे यश…

डेरवण येथील नेमबाजी स्पर्धेत पाच जणांचे यश…

सावंतवाडी

नुकतीच डेरवण, चिपळूण येथे संपन्न झालेल्या डेरवण युथ गेम्स २०२३ या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धे मध्ये सिंधुदुर्गातील पाच नेमबाजांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. ही स्पर्धा ओपन साईट, पिपसाईट व एअरपिस्तूल या क्रीडा प्रकारात घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
यात कु.आयुष दत्तप्रसाद पाटणकर ( मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडी ) याने १० मी. पिस्तूल प्रकारात १७ वर्षां खालील गटात ४०० पैकी ३७१ गुण मिळवून सुवर्ण पदक पटकाविले त्याने यावर्षी पदकांची हॅट्रिक पूर्ण केली. याच क्रीडा प्रकारात १४ वर्षां खालील गटात कु. स्वामींसमर्थ संजय बगळे, कुडाळ याने ३५६ गुणांसह रौप्य पदक मिळविले. १० मी.पीपसाईट प्रकारात १७ वर्षाखालील गटात कु. वैष्णवी गोविंद भांगले, बांदा हिने ४०० पैकी ३८४ गुण मिळवून कांस्यपदक पटकाविले. त्याचबरोबर याच क्रीडा प्रकारात कु. खुशल संभाजी सावंत (भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी ) याने १४ वर्षाखालील गटात ४०० पैकी ३८० गुण मिळवून रौप्य पदकाचा मानकरी ठरला. तसेच परशुराम तिलाजी जाधव याने १० मी. पिस्तूल प्रकारात सहभाग घेऊन चांगली कामगिरी केली.
सहभागी सर्व खेळाडू उपरकर शूटिंग रेंजवर सराव करत असून त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण लाभले तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मौलिक मार्गदर्शन मिळाले.विजेत्या सर्व खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा