*ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालयाच्या कर्मचार्यांचा गौरव*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने रुग्णालयाच्या अधिष्ठाता सन्माननीय डॉ. पल्लवी सापळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजानन चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण राठोड, डॉ. रेवंत, अधिसेविका योजना, प्रशासकीय अधीक्षक दीपक लाड, विजय अंधारे, श्रीमती पोशिंदे, अनिल दळवी, संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ राणे, सचिव यशवंत दळवी व संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच रुग्णालयातील सर्व संघटना कृती समिती, तृतीय श्रेणी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, रुग्णालयातील सर्व संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांचा रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आला.
कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये अतिदक्षता विभाग, अपघात विभाग, कक्ष क्रमांक ४, ६, १२, ३२, ४०, ४३ यांच्यासह कोविड लॅब स्क्रीन विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व १८० कर्मचारी स्टाफ नर्सेस यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कोविड-१९ प्रादुर्भावाच्या वेळी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी केले.
*👉मोफत समुपदेशन….मोफत समुपदेशन …*
*”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने*
*” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी*
🔹रत्नागिरी तालुक्यातील इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी, यांच्या वतीने *_”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने “_* १२ वी नंतर विविध क्षेत्रातील सुवर्ण संधींवर मार्गदर्शन हा मोफत समुपदेशन कार्यक्रम *_शुक्रवार , दिनांक २४ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:००_* या वेळेत *मराठा भवन मंगल कार्यालय* ,जिल्हा परिषदे जवळ , रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे .
*प्रमुख वक्ते :प्रा .विजय नवले (करिअर पाथ निर्मिती मध्ये विश्वविक्रम करणारे तज्ञ )*
🔹या कार्यक्रमासाठी मोफत नाव नोंदणी खालील गुगल फॉर्म लिंक द्वारे करावी .
https://forms.gle/Sv7pZYtT9X1Lw2F18
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था*
*कॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वूमेन*
*📲संपर्क क्रमांक :*
*९४२०२७४११९*
*७९७२९९७५६७*
*Advt link …👇*
*————————————–*