महामार्ग उड्डाण पुलाखालील सर्व स्टॉल हटाव मोहीम होणार ; पोलिसांनी केली रंगीत तालीम
कणकवली
कणकवली शहरातील मुंबई गोवा महामार्ग उड्डाणपुलाखाली लागलेले शेकडो अनधिकृत स्टॉल हटवण्याची मोहीम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून हाती घेण्यात आली आहे. १७ व १७ मार्च या दोन दिवसात स्टॉल हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कणकवली पोलिसांना बंदोबस्तासाठी लेखी पत्र दिले आहे. त्यासंबंधी स्टॉल धारकांनाही लेखी नोटीसा बजावल्या आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कणकवली पोलिसांना बंदोबस्तासाठी लेखी पत्र दिल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्ताची रंगीत तालीम केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, महिला उपनिरीक्षक वृषाली बर्गे,उपनिरीक्षक सरदार पाटील ,वाहतूक पोलीस विनोद चव्हाण ,पोलीस पांडुरंग पांढरे आदींसह पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते. तसेच स्टॉल हटाव मोहिमेला स्टॉलधारक सहकार्य करतील का? विरोध करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.