सौ.वैष्णवि मोंडकर,अध्यक्ष मातृत्व वरदान फाऊंडेशन
केंद्र सरकारने प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानाची दिनांक ९/९/२२ रोजी शुभारंभ केला असून क्षय रुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळावे यासाठी समाजातील सहकारी ,संस्था,वैयत्तिकरित्या क्षय रुग्णांना सहाय्य करून निक्षय मित्र बनू शकतो या माध्यमातून क्षय रुग्णांना ६ महीने ते ३ वर्षे फूड बास्केट च्या माध्यमातून कोरडा आहार पुरविला जाऊ शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्षय रुग्णाचे प्रमाण अधिक असून टी.बी. मूक्त भारत अभियाना मध्ये भाग घेऊन जिल्ह्यातील क्षय रुग्ण दत्तक घेऊन त्यांना मातृत्ववरदान फाऊंडेश व पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून कोरडा आहार दरमहा पुरविला जाणार आहे या योजनेच्या माहिती साठी दिनांक १७/३/२३ रोजी सकाळी ११.३० वाजता हॉटेल श्री महाराज मालवण येथे आरोग्य अधिकारी उपस्थित राहून सदर योजने विषयी मार्गदर्शन करणार असून मातृत्ववरदान फाउंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या क्षय रुग्णांना फूड बास्केट किट आरोग्य अधिकारी मार्फत वितरित केले जाणार आहे तसेच सदर योजनेत भाग घेणाऱ्या इच्छूक व्यक्ती ,संस्थाचे चा सहभाग घेतला जाणार असून अधिकाधिक संस्था,व्यक्ती नि सदर फूड बास्केट अभियानात भाग घेऊन टी.बी मुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा अधिक माहिती साठी 82751 06375 या नंबर वर संपर्क करावा .असे आवाहन मातृत्ववरदान फाऊंडेशन अध्यक्ष सौ.वैष्णवी मोंडकर व उपाध्यक्ष मेघा सावंत यांनी केले आहे.