You are currently viewing सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून खा. विनायक राऊत उदयास आले- आ. वैभव नाईक

सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून खा. विनायक राऊत उदयास आले- आ. वैभव नाईक

*सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून खा. विनायक राऊत उदयास आले- आ. वैभव नाईक*

*ओरोस शरद कृषिभवन येथे खा. विनायक राऊत यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न*

जनतेच्या प्रेमामुळे खा.विनायक राऊत हे दोन वेळा खासदार झालेत आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आता तिसऱ्या वेळी खासदार होण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही.२०१३ साली विनायक राऊत यांना बाळासाहेबांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हयात काम करण्याचा आदेश दिला आणि पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्यांनी दोन्ही जिल्हे पिंजून काढले.त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा नव्याने रुजू लागली. शिवसेनेचे भगवे वादळ निर्माण झाले. १० वर्षाच्या खासदारकीच्या कारकिर्दीत अत्यंत अभ्यासू खासदार म्हणून त्यांनी काम केलेच त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून राऊत साहेब उदयास आले. त्यांना उत्तम आरोग्य,उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिल्या.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे सचिव, लोकसभा शिवसेना गटनेते, खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस ओरोस येथील शरद कृषिभवन येथे आज उत्साहात साजरा करण्यात आला.औक्षण करत केक कापून व पुष्पहार घालून खा. विनायक राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात कोट्यावधीची विकास कामे झाली. खा. राऊत यांच्या मार्गदर्शनखाली शासकीय मेडिकल कॉलेज, चिपी विमानतळ, मुंबई गोवा महामार्ग हे महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले. चक्रीवादळात नुकसानभरपाई मिळवून देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतरही प्रश्न सोडविण्याचे काम राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करीत आहोत असे सांगितले.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, सहसंपर्क प्रमुख अतुल रावराणे,जिल्हा समन्वयक बाळा गावडे, वसंत केसरकर, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, अमरसेन सावंत, राजन नाईक आदींसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा