शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियनची रक्तदान आंदोलन करत केली मागणी
सावंतवाडी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्गात व्हावे यासाठी, तसेच डॉ. अभिजित चितारी यांची बदली केल्याने उपजिल्हा रूग्णालयाला तातडीने फिजीशिअन द्यावा अथवा बदली रद्द करावी या मागणीसाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी रक्तदान आंदोलन छेडले होते. तर पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेत माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी याबाबत मागणी केली होती. युवकांच्या या मागणीची तातडीन दखल घेत दोन्ही मागण्या शासनान मान्य केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करत याला मंत्रिमंडळाने आदेश दिल्याचा शासन आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला आहे. तर डॉ. अभिजित चितारी यांना सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात रुजू करत संघटनेच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही न झालेल्या अशा या विधायक रक्तदान आंदोलनामुळे दोन्ही प्रश्न मार्गी लागले आहेत. यासाठी संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्गात व्हावे हि गेली अनेक वर्ष जनतेची मागणी होती. यासाठी 1 ऑक्टोबरला रक्तदान आंदोलन करत या मागण्या संघटनेच्यावतीने करण्यात आल्या होत्या. या मागण्या मान्य केल्याबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आरोग्य प्रशासनाचे संघटनेच्या वतीने त्यांनी आभार व्यक्त केले. तर रक्तपेढीतील कर्मचारी, डॉ. बागवान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कृती समितीचे अँड. शामराव सावंत , लक्ष्मण नाईक तसेच ज्या शेकडो युवकांनी रक्तदान करत आंदोलन केले. शासनाच नुकसान न करता मागण्या शासन दरबारी पोहचवल्या. तर आम्ही घेऊन नाही तर समाजाला देऊन आंदोलन केले असून या पुढेही असच कार्य करत राहणार असल्याच मत देव्या सूर्याजी यांनी व्यक्त केले आहे.