कणकवली तालुक्यातील फोंडा येथील बिजली नगर भागातील आजच्या गावाच्या ग्राउंडच्या मागे संध्याकाळी ६.३० वाजता जुगाराला सुरुवात झाली असून रात्री ११.०० वाजेपर्यंत जुगाराची मैफिल रंगणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजली आहे.
फोंडा येथील दात पडक्या आप्पा याची ४० पैसे, वेंगुर्ल्याच्या सुभल्याची दहा पैसे, पारावरच्या विठ्ठलाची ५० पैसे तक्षिम असल्याची माहिती मिळते. खेळाच्या पहिल्या सत्रात तब्बल ६०००० रुपये पटाला मिळाले आहेत. घाड्यांचा दिपल्या, अदमांचा संज्या, सामतांचा तीर्थ, आबाची वरात, हळद लागलेला प्रसाद, असे मोठे जुगारी मांड्या घालून खेळण्यास बसले असून काही तर चक्क कोटी स्टूल घेऊन जुगाराचा आनंद लुटत असल्याचे समजते. जिल्ह्यात जुगाराचा सुकाळ झाला असून त्यांना आश्रय देणाऱ्या खाकीचा शिलेदार मात्र मालामाल होत आहे
जिल्हा पोलिस अधीक्षक जोपर्यंत जिल्ह्यातील जुगारांकडे गंभीरपणे पाहत नाहीत तोपर्यंत झारीतील शुक्राचार्य अवैध धंद्यांना राजाश्रय देत राहणार हे निश्चित…!