You are currently viewing गाबीत समाजातील वधू- वर यांच्या मोफत नाव नोंदणीसाठी आवाहन

गाबीत समाजातील वधू- वर यांच्या मोफत नाव नोंदणीसाठी आवाहन

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित समाजातील वधू – वर यांना विवाह संबंधी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने विवाहास उशीर, ठराविक वयात लग्न न जमणे, लग्न जमण्यास काही अडचणी येणे अशा समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी गाबीत समाजातील तज्ञांमार्फत वाडी वाडीत येऊन मार्गदर्शन देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी वधू आणि वर तसेच त्यांच्या पालकांनी संबंधित प्रतिनिधीकडे माहिती संकलित करावी, असे आवाहन विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समिती महाराष्ट्रचे उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मालवण, देवगड, वेंगुर्ले तालुक्यातील गावांमध्ये वाडी वाडीत वधू – वर आणि त्यांच्या सोबत पालक घेऊन प्रत्यक्ष अनुभव आणि मार्गदर्शन चर्चा घडवून आणून समाजात वधू – वर यांचे लग्न जुळणे हा या उपक्रमामागील मानस आहे. गाबीत समाजातील मुले मुली यांच्यासमोर हवे तसे शिक्षण, नोकरी, व्यवसाय असूनही आई वडिलांसमोर त्यांच्या विवाहची मोठी समस्या भेडसावत आहे. हे लक्षात घेता समाजातील मुलांनी आणि पालकांनी एकत्रित यावे याकरीता तसेच समाजातील वधू – वर यांनी व त्यांच्या पालकांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन याबाबत तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन व्हावे, यासाठी आपल्या मुला मुलींच्या पत्रिका व माहिती प्रतिनिधी अनिल कुबल ९४२३२६४५६७, बाळू वस्त ९३७१२१७६०६, शंकर पोसम ९१६७७२९१३६, नाना कुमठेकर ९४०५६३७९००, दाजी जुवाटकर ८२६२०३०४७७, तुळशीदास कासवकर ८२६२८९८३८७, हेमंत बांदेकर ९०८२८४६६२२, यांच्याकडे द्यावी, असे आवाहन सुरेश बापर्डेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा