*बस ड्रायव्हर ते जुगार तक्षिम… मोरजेच्या निकेशचा उलटा प्रवास*
बस ड्रायव्हर म्हणून परिचित असलेल्या मोरजेच्या निकल्याने ड्रायव्हरचा जॉब सोडून जुगाराचा अड्डा सुरू केला. निकल्याचा जुगार अड्डा म्हणजे लुटमार… लुटण्याचा उघड धंदा. पत्ते टाकताना हात चलाखी करून खालचा पत्ता टाकण्याची कला अवगत असलेला निकल्या जुगाराच्या धंद्यात एका रात्रीत लाखोंची उलाढाल करतो.
कणकवली पासून आठ किलोमीटर अंतरावरील कसवन रानमाळावर व्हाळाच्या पलीकडे दुपारपासून रात्री साडेदहा पर्यंत जुगाराची मैफिल बसते. कणकवलीच्या आजूबाजूच्या परिसरातील त्याचप्रमाणे घाटमाथ्यावरील आणि गोव्यातील बरेचसे जुगारी निकल्याच्या जुगार अड्ड्यावर आपली हजेरी लावतात. मोर्जेच्या निकल्याचे आणखी काही तक्षिमदार पार्टनर आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे भाजीवाला सोट्या, चव्हाणांचा बाप्पा आणि जुगाराचा बादशहा म्हणून ओळख असलेला टिंगल मेन्थेरोचा जिवलग मित्र असलेला राजपूत रामाचा सेतू, लंगडा दांडू आदी मिळून हा जुगाराचा अड्डा चालवतात. काल दिवसभरात झालेल्या जुगाराच्या मैफिलीत या सर्व पार्टनरना मिळून तब्बल १ लाख ७० हजार रुपयांचा फायदा झाला.
मिरजेचा निकल्या चालवत असलेला हा जुगार अड्डा खाकी वर्दीतील शिलेदार कापू वरातच्या आशीर्वादाने सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. निव्वळ दोन-चार हजाराच्या हप्त्यासाठी खाकी वर्दीतील कापू वरात आपले इमान भाड्याने देत आहे. त्यामुळेच जिल्हाभरात इतर व्यवसाय डबघाईत आलेले असताना सुद्धा जुगाराच्या अवैद्य व्यवसायात तेजी दिसून येत आहे, आणि त्यातूनच तरुण पिढी बरबादीकडे जात आहे. खाकी वर्दीने जुगारांना आशीर्वाद देण्यापेक्षा अवैद्य धंद्याला आळा बसविण्यासाठी योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे.