You are currently viewing रेडी ग्रामदैवत माऊली मंदिराच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर

रेडी ग्रामदैवत माऊली मंदिराच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर

🔸 रेडी माऊली मंदिर विश्वस्तांनी मानले भाजपाचे आभार .

🔸जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ यांचा पाठपुरावा..

वेंगुर्ला :

पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०२२ – २३ मध्ये जिल्हास्तरावरील कामांसाठी २१६३०.५१ लक्ष येवढ्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देवुन १०८१५.१९ लक्ष एवढा निधी सन २०२२ – २३ मध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता दिली आहे.
यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला ८.९६ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून, वेंगुर्ले तालुक्यातील रेडी माऊली मंदिर परिसरात बहुउद्देशीय सभागृह व अन्नछत्र बांधणे यासाठी २.५० कोटी, तसेच रेडी माऊली मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे व परिसर सुशोभीकरण करणे यासाठी २.५० कोटी अशापद्धतीने ५ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे.

राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात सदर कामांना मंजुरी दिली. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. रविंद्र चव्हाण तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सदर कामांना पक्षाच्या वतीने शिफारस दिली व पाठपुरावा केला याबद्दल भाजपा पक्षाचे आभार मानण्यासाठी माऊली मंदिराचे विश्वस्त व मानकरी यांनी भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भेट देऊन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई व तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

यावेळी रेडी माऊली मंदिराचे विश्वस्त संदिप राणे, जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ, देवस्थानचे मानकरी भानुदास राणे, आत्माराम राणे, सुहास राणे, अमोल राणे, कृणाल पिळणकर, प्रल्हाद रेडकर तसेच ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा