*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आला वसंत ऋतु आला*🌹
प्रेमे स्वागत करु या
आला वसंत ऋतु आला
दुरवर माळरानी
लाल पळस फुलला
फुटे पालवी फांदीला
गुलमोहोर फुलला
सडा लालेलाल झाला
रस्ता बहरून गेला
तांबुस पिवळ्या पानांआड
पिवळा पक्षी बोलतो
पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याशी
फुलपाखरू बोलतो
येता वसंत पंचमी
रंगला हिरवा मळा
आम्रतरू मोहरला
कुहूकुहूच्या स्वराला
वसंत ऋतु बहरला
पळस केशरी रंगला
कोकिळ सुर निनादला
आंबा मोहोर फुलला
पंचम सुरांनी रान
रंग रंगात रंगला
पर्णभारात हिरव्या
राघु मैनेसवे दंगला
हिरवी पाने डवरली
फुलपाखरे भिरभिरली
आंबटगोड पाला खाण्या
माकडे ती हुंदडली
सुगंधले कुंजवन
फुलांनी रंग ल्यायले
भुं भुं करीतसे भुंगा
फुलाभोवती रंगले
नवऋतु सामोरला
नवयुवती जणु सजल्या
नवप्रीत रंगण्यासी
अधीर मनी जाहल्या
*शीला पाटील. चांदवड.*
*👮♂️👮♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮♂️👮♂️*
*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺
*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*
*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*
*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*
*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*
*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*
*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*
https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 संजय शिंदे : 9307051091*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*