You are currently viewing बांद्यातील नियोजित उड्डाणपुलासाठी आज अंतिम सीमांकन पूर्ण…

बांद्यातील नियोजित उड्डाणपुलासाठी आज अंतिम सीमांकन पूर्ण…

अतिक्रमणग्रस्तांना ४ दिवसाची मुदत; त्यानंतर कामाला सुरुवात, अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण…

बांदा

शहरात प्रस्तावित असलेल्या ६०० मिटर लांबीच्या नियोजित उड्डाणपुलासाठी आज महामार्गावर अंतिम सीमांकन करण्यात आले. भूमी अभिलेखच्या १९९१ च्या नकाशाप्रमाणे दोन्ही बाजूची हद्द आज ठरविण्यात आली. अंतिम सीमांकनानुसार अतिक्रमणग्रस्त गाळेधारकांना ४ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर अतिक्रमण हटवून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता महेश खटी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा