*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली-*
*काव्यपुष्प -१७ वे*
———————–
श्रीमहाराज येहळेगावी आले
तुकामाई”हे आपले सद्गुरू
विचार अंतर्मनात प्रकाशले
श्रीगुरूंच्या भेटी मन आतुरले ।।
गुरुमाऊली तुकामाईबद्दल
घेऊया जाणुनी आपण जन हो
दुर्मिळ ,दुर्लभ योग असतो हा
लाभणे श्रीगुरूंचा सहवास हो ।।
येहळेगाव आडवाटेचं गाव
इथले काशिनाथपंत, पार्वती
तुकामाईच्या माता-पित्याचे नाव
ओळखे यांना सारा येहळेगाव ।।
श्रीदत्त अवधूत आराध्य दैवत
पार्वतीबाईचे जप, ध्यान, उपास
काशिनाथपंत साधनेत मग्न असे
दिनक्रम श्रीगुरुसेवेत जात असे ।।
दत्तअवधुतांची कृपा हो झाली
पार्वतीबाईंना पुत्र- प्राप्ती झाली
पंतांची गुरूसेवा सफल झाली
अरुणदासाची- लेखणी धन्य झाली ।।
————————————
कवी-अरुणदास – अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
—————————————