सावंतवाडी
देवाकडील समईच्या वातीमूळे अंगावरील गाऊनने पेट घेतल्याने गंभीरित्या भाजलेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुगंधा नारायण वंजारी ( ९०, रा. झिरंगवाडी, सावंतवाडी ) असे तिचे नाव आहे. याबाबत तिचा मुलगा प्रशांत वंजारी यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली असून आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती असे की सुगंधा वंजारी या वयोवृद्ध असल्याने बेडवरच होत्या. दुपारी त्यांचा मुलगा प्रशांत हा औषध आणण्यासाठी बाजारात गेला असता दीड ते पावणेतीनच्या सुमारास जवळ असलेल्या देवाकडील समईच्या वातीमूळे त्यांच्या गाऊनला आग लागल्याने गाऊनने पेट घेतला. यात त्या गंभीररित्या भाजल्या.
मुलगा प्रशांत घरी आल्यानंतर आई भाजलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्याने तात्काळ तिला उपचाराकरता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचे निधन झाले असल्याने वैद्यकीय अधिकार्यांनी तिला मृत घोषित केले. याबाबत मुलाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक अमित गोते, गुरुनाथ भागवत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.