You are currently viewing यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कारांचे १२ मार्च रोजी वितरण

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कारांचे १२ मार्च रोजी वितरण

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कारांचे १२ मार्च रोजी वितरण*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

यशवंतराव चव्हाण सेंटर युवा विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२२-२३’ च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून युवांसाठी सातत्याने सर्जनशील व प्रोत्साहनपर उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार, साहित्य, इनोवेशन आणि पत्रकारिता या क्षेत्रांतील विविध गुणवंत युवांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
सदर पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दिनांक १२ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई ४०००२१ येथे सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये एकवीस हजार, मानपत्र, आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे.

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२२-२३ चे मानकरी*

साहित्य युवा पुरस्कार – अमृता देसी (कथासंग्रह – आत आत आत) आणि पवन नालट (कवितासंग्रह – मी संदर्भ पोखरतोय)

सामाजिक युवा पुरस्कार – हेमलता पाडवी आणि प्रवीण निकम

क्रीडा युवा पुरस्कार – हर्षदा गरुड (वेट लिफ्टिंग) आणि रुद्राक्ष पाटील (नेमबाजी)

युवा इनोव्हेटर पुरस्कार – दिव्यप्रभा भोसले, सारंग नेरकर आणि सुमित पाटील (विशेष पुरस्कार)

पत्रकारिता युवा पुरस्कार – शर्मिष्ठा भोसले आणि मुस्तान मिर्झा

युवा उद्योजक पुरस्कार – अनिता माळगे आणि अनिश सहस्त्रबुद्धे

रंगमंचीय कलाविष्कार युवा पुरस्कार – मुग्धा डिसोजा (नृत्य), सुमित धुमाळ (गोंधळी) आणि महेश खंदारे (नाट्य)

प्रतिक्रिया व्यक्त करा